५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत कॉंग्रेसच्या ५१ खासदारांनी राहुल गांधींना अध्यक्षपद न सोडण्यासाठी विनंती केली. मात्र राहुल गांधींनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे ५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधींनी आपला निर्णय बदलला नाही. यावेळी युवा कॉंग्रेसचे सदस्य राहुल गांधींच्या घराबाहेर मोठ्या संख्येने जमले आणि राहुल यांनी राजीनामा मागे घेऊन अध्यक्षपदी विराजमान होण्याची विनंती हातात पोस्टर घेऊन करत होते.

कॉंग्रेस खासदार शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनी लोकसभेतील पराभवाला केवळ तुम्ही जबाबदार नसून पूर्ण पक्ष जबाबदार आहे, असे म्हणत राहुल गांधींचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल गांधी यांनी पराभवाची पूर्ण जबाबदारी माझी असल्याचे म्हणत अध्यक्षपदी राहणार नाही, असे पुन्हा पुन्हा सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More