५० टक्के मतांच्या व्हीव्हीपॅट पडताळणीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

५० टक्के मतांच्या व्हीव्हीपॅट पडताळणीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रात झालेल्या मतदानापैकी ५० टक्के मतांची मतदानयंत्रातून व ५० टक्के मतांची व्हीव्हीपॅटमधून मोजणी केली जावी. या दोन्हींची पडताळणी करून नंतरच निकाल जाहीर केला जावा, अशी मागणी करत २१ विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तेलगु देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे याचिकेतील मुख्य याचिकाकर्ते आहेत. याआधी २१ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन अशीच मागणी केली होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा करताना जी माहिती दिली त्यावरून ही मागणी अमान्य झाल्याचे स्पष्ट झाल्याने या पक्षांनी कोर्टात धाव घेतली आहे.

मतदानयंत्रांमध्ये मतदानाच्या आधी किंवा मतदानानंतर काही हेराफेरी केली गेलेली नाही याची खातरजमा व्हावी यासाठी दोन्ही प्रकारची ५०-५० टक्के मते घेऊन मोजणी केली जावी, अशी या पक्षांची मागणी आहे. आगामी निवडणुकीत देशभरातील सर्व १० लाख मतदान केंद्रांवर मतदानयंत्रे व व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

#Bond25 लशाना साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक...
Read More
post-image
देश मुंबई

कर्नाटकच्या बंडखोर आमदारावर मुंबईत उपचार

मुंबई – कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेस सुरुवात झाली आहे. मात्र बंडखोर आमदार यावेळी उपस्थित नसल्याने कुमारस्वामी सरकारवरील संकट कायम आहे. त्यातच मुंबईत असलेले कॉंग्रेसचे बंडखोर...
Read More
post-image
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More