२५ नोव्हेंबरपर्यंत महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडेल – सत्तार – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

२५ नोव्हेंबरपर्यंत महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडेल – सत्तार

मुंबई – २५ नोव्हेंबरपर्यंत राज्यात महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडेल,  असा दावा शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केला आहे.  ‘राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. कारण, येत्या आठवड्याभरात सत्तास्थापन होईल’, असे ते म्हणाले. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच ‘शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही त्यांची डोकी फोडू’, अशी धमकीच त्यांनी दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सरकार स्थापन होईल, असे आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हटले. त्यामुळे डिसेंबर महिन्यात राज्याला मुख्यमंत्री मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या सर्व आमदारांची २२ नोव्हेंबर रोजी बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीला येताना सर्वांना आपली ओळखपत्रं आणि पाच दिवसांसाठीचे कपडे घेऊन येण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या बैठकीनंतर पुढील दोन-तीन दिवस आम्हा शिवसेनेच्या सर्व आमदारांना एकाच ठिकाणी रहावे लागण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील पावलं काय टाकायची हे निश्चित होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

काश्मीरनंतर लडाख भूकंपाने हादरले

लेह – जम्मू-काश्मीरमध्ये सलग झालेल्या भूकंपानंतर आज लडाख भूकंपाच्या धक्क्याने हादरले. लडाखमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्र बिंदू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात समूह संसर्गाला सुरुवात? राजेश टोपे म्हणाले…

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांचा (corona Virus) आकडा दिवसेंदिवस वाढत असून निमयित साडेचार ते पाच हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात समूह संसर्ग म्हणजेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सरकारी महसुलात घट, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात

पुणे – लॉकडाऊनमुळे सरकारच्या महसुलात घट झाल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करावी लागेल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली....
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

पंढरपुरला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: चालवली ८ तास गाडी

मुंबई – वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा खंडीत न करता वारीचं स्वरुपत सीमित करून साधेपणाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त ना विठूचा गजर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यांना दिलेलं धान्य गेलं कुठे? फक्त १३ टक्केच स्थलांतरीत मजुरांनी घेतला मोफत धान्याचा लाभ

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये याकरता केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवली जाते आहे. या योजनेअंतर्गत लोकांना मोफत...
Read More