२१ फैरींच्या सलामीसोबत पद्मश्री अजित वाडेकरांवर होणार अंत्यसंस्कार – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मुंबई

२१ फैरींच्या सलामीसोबत पद्मश्री अजित वाडेकरांवर होणार अंत्यसंस्कार

मुंबई – अर्जुन आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भारताचे यशस्वी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी १२:०० वाजताच्या सुमारास, सरकारी इतमामात दादर येथील शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार होणार आहेत. याप्रसंगी हवेत २१ फैरींची सलामी देऊन महाराष्ट्र राज्य शासनातर्फे मानवंदना दिली जाणार आहे.

यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक आणि कुटुंबवत्सल पुरुष अशा विविध भूमिका वाडेकर समरसून जगले. १९७१ च्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमधील देदिप्यमान यशाचे श्रेय वाडेकर यांनाच दिले जाते. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा वाडेकर, मुले प्रसाद, विपुल मुलगी कश्मिरा असून मुलगा विपुल आज रात्री अमेरिकेहून येणार आहे. बुधवारी रात्री ८.४५ च्या सुमारास त्रास जाणवू लागल्याने वाडेकर यांना वरळी येथील त्यांच्या निवासस्थानाहून जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. १९७१ चे वेस्ट इंडिज आणि इंग्लंडवरील विजय हे भारताच्या आजवरच्या क्रिकेट वाटचालीतील मैलाचे दगड मानले जातात. तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम फलंदाज आणि स्लीपमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी वाडेकर यांची ख्याती होती. खेळाडू म्हणून भारतीय संघासाठी यशस्वी योगदान दिल्यानंतर भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी यशस्वी भूमिका बजावली. त्याव्यतिरिक्त अपंगांच्या क्रिकेटसाठीही त्यांचा मोठा सहभाग होता. स्टेट बँकेत सर्वोच्च पदावर पोहोचणारा क्रिकेटपटू म्हणजे अजित वाडेकर. नर्मविनोदी किस्से ऐकवून उपस्थितांना क्रिकेटच्या जुन्या दिवसांच्या आठवणींनी दंग करण्यात त्यांचा हातखंडा होता. शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जवळपास ६ वर्षे काम पाहिले. क्रिकेटपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतरही क्रिकेट व मैदानांशी त्यांचे नाते कधीही तुटले नाही. ६०च्या दशकातील लोकप्रिय क्रिकेटपटू म्हणून ख्याती मिळविणाऱ्या अजित वाडेकर यांच्या जाण्याने क्रिकेटच्या क्षितिजावरील आणखी तारा निखळला आहे, अशी भावना भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली. तर महान फलंदाज, यशस्वी कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या भरीव योगदानामुळे अजित वाडेकर नेहमीच स्मरणात राहतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही वाडेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

आज  सकाळी १०:०० वाजता, त्यांच्या स्पोर्ट्सफिल्ड अपार्टमेंट, वरळी सी फेस येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार असून त्यानंतर दुपारी १२:०० वाजता दादर येथील विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More