२०१६च्या आर्थिक वर्षात बॅंकांची सुमारे 17 हजार कोटींनी फसवणूक – केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला – eNavakal
देश

२०१६च्या आर्थिक वर्षात बॅंकांची सुमारे 17 हजार कोटींनी फसवणूक – केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ च्या आर्थिक वर्षात देशभरातल्या बँकांची सुमारे 17 हजार कोटींची फसवणूक झाल्याचे आढळून आले. गेल्या आर्थिक वर्षांत बँकांवर दरोडा पडण्याच्या आणि चोरी होण्याच्या घटना देशभरात जास्तच घडलेल्या दिसतात. एकूण 65.3 कोटी रुपयांनी ही लूट करण्यात आली. तसेच चालू वर्षात 393 घटना घडल्या असून, 18.48 कोटी रुपये लुट केली गेली. या सर्वाना आळा बसावा, म्हणून सर्व बँकांना त्यांच्या शाखा आणि एटीएमच्या सुरक्षा उपाययोजना वाढवण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी दिल्याचे कळते. ही फसवणूक कुठेतरी रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सायबर सुरक्षेवर स्थायी समिती नेमली आहे, जिणेकरून सुरक्षितता राखली जाईल, तसेच ही समिती वाढलेल्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे निर्माण होणा-या धोक्यांचा आढावा घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करणार आहेत. त्याचदरम्यान नोटबंदींवर चर्चा करत असताना, नव्याने चलनात आलेली दोन हजार रुपयाची नोट बंद होणार, ही अफवा असून त्यावर विश्वास ठेऊ नये,असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More