१ मे पासुन होणार ‘हे’ महत्वपुर्ण बदल ! – eNavakal
आघाडीच्या बातम्या जीवनावश्यक देश

१ मे पासुन होणार ‘हे’ महत्वपुर्ण बदल !

मुंबई -नवीन आर्थिक वर्ष २०१९-२० सुरु होऊन जवळपास १ महिना पूर्ण होत आला आहे. एप्रिल महिन्यामध्ये अनेक नवीन नियमांची अंमलबजावणी झाली. त्याचप्रमाणे काही नवीन नियम 1 मे महिन्यापासून लागू होणार आहेत. बँकिंग, हवाई, मोबाईल आणि रेल्वे या क्षेत्रांमध्ये हे महत्वपूर्ण बदल विशेषकरून लागू होतील.

रेल्वे प्रवाशांसाठी होणार हा बदल

1 मेपासून रेल्वेचा चार्ट लागण्याच्या 4 तास आधी आपल्याला ‘बोर्डिंग’ स्टेशन बदलता येणार आहे. सध्या आरक्षित तिकिटांचे बोर्डिंग स्टेशन बदलता येत नाही. मात्र, 1 मेनंतर हे शक्य होणार आहे. ‘बोर्डिंग’ स्टेशनमध्ये बदल करण्याचा कालावधी 24 तासांवरून 4 तासांवर आणण्यात आला आहे. परंतु, अशी तिकीटे रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा परतावा (रिफंड) मिळणार नाही.

मोबाइल युजरसाठी  होणार मोठा बदल

1 मेपासून आधारकार्डशिवाय सिम कार्ड खरेदी करता येणार आहे. डिजिटल आयडी प्रुफ म्हणून आधारकार्ड हे वापरले जाते. नवीन सिमकार्ड घेण्यासाठी विनाआधारवाली डिजिटल केवाईसी सिस्टम तयार करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे नवीन सिमकार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वेरिफिकेशन करून १ ते २ तासांमध्येच सक्रिय करून दिले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा नियम लागू झाला आहे.

पंजाब नॅशनल बॅंकेत होणार हे बदल

पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या ग्राहकांना डिजिटल वॉलेट मधील रक्कम ३० एप्रिलपर्यंत खर्च करण्यास सांगितली आहे. किंवा त्वरित निधी हस्तांतरण सेवेद्वारे (IMPS) आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी संगितली आहे. ग्राहकांनी आपल्या डिजिटल वॉलेटमधून पैसे काढले नाही तर अडचणींमध्ये येऊ शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांसाठी होणार हे बदल

१ मे पासून SBI बँकेच्या ठेवी आणि कर्ज व्याज दर RBI च्या बेंचमार्क दराशी जोडले जातील. त्याचा आरबीआयच्या रेपो दर बदलणे, बँकेच्या ठेवी आणि कर्ज दरावर परिणाम होईल. मात्र हा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना आधीच्या तुलनेत कमी व्याज मिळेल. हा नियम केवळ १ लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी आणि कर्ज व्याजदरांवर लागू होईल.

गॅस दर

घरघुती गॅस सिलिंडरच्या नव्या किमती जारी होणार आहेत. यापुर्वी 1 एप्रिलला घरघुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली होती. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी बिना सबसिडीच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 5 रुपये प्रति सिलिंडरची वाढ केली आहे. तर सबसिडीवाले सिलिंडरच्या किमतीत 25 पैशांची वाढ केली आहे.

तिकीट रद्द केल्यास शुल्क नाही

१ मेपासून एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट 24 तासांच्या आत रद्द केल्यास आपल्याला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More