१७ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

१७ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार

अहमदनगर – पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. आता पश्चिम महाराष्ट्रातील पूर आपत्ती काहीशी ओसरली असल्याने महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात होणार आहे. १७ ऑगस्टपासून या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार असून त्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे. यात्रेचा पहिला टप्पा विदर्भात झाला तर दुसऱ्या टप्प्यात नगर आणि मराठवाड्यातून ही यात्रा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ९३ विधानसभा मतदारसंघांत २,७४५ किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे.

१८ ऑगस्ट रोजी यात्रा नगर जिल्ह्यात येणार असून या दिवशी अकोले व संगमनेरला मुख्यमंत्र्यांच्या सभा होणार आहेत. तसेच याच दिवशी राहुरी आणि नगरला स्वागत समारंभ होणार आहे. तर १९ ऑगस्ट रोजी पाथर्डी, आष्टी आणि जामखेड येथे सभा घेऊन मुख्यमंत्री बीडला रवाना होणार आहेत. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रावरील पूर संकट ओसरले असले तरी पूरग्रस्तांचे संसार वाहून गेल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अतिशय बिकट झाला आहे.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

काबूलमध्ये लग्न समारंभात बॉम्बस्फोट! ४० ठार, १०० जखमी

काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका लग्न समारंभात झालेल्या बॉम्बस्फोटात जवळपास ४० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई – मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी आज रविवार, 18 ऑगस्ट 2019 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) भारताच्या मुत्सद्देगिरीचे अपूर्व यश

जम्मू काश्मिरमधील 370कलम हटवण्याच्या विरोधात पाकिस्तानकडून जे जे प्रयत्न होत आहेत त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More