१५ विमानतळांची देखरेख खाजगी कंपन्यांना – eNavakal
News देश

१५ विमानतळांची देखरेख खाजगी कंपन्यांना

नवी दिल्ली– विमानतळांचा दर्जा  उंचावण्याच्या दृष्टीने देशातील सुमारे १५ विमानतळांवरील व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. हे सर्व विमानतळ सद्यस्थितीत नफ्यात आहेत. एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. विद्यमान राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडून प्रथम विमानतळ व्यवस्थापनाचे खासगीकरण होत आहे.

यापूर्वी यूपीए सरकारने नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, आणि बेंगळुरू या चार प्रमुख विमानतळांवरील व्यवस्थापनाचे खासगीकरण केले आहे.
देशांतर्गत विमानतळांच्या व्यवस्थापनाचे अधिकार केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडून खासगी कंत्राटदारांना देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने आर्थिक व्यवहार विभाग व निती आयोगाला एक सर्वसमावेशक यंत्रणा तयार करण्यास सांगितली आहे, जयपूर व अहमदाबाद विमानतळांच्या व्यवस्थापनाच्या कंत्राटासाठी सरकारने यापूर्वी निविदा मागविल्या होत्या. मात्र त्यास चांगला प्रतिसाद मिळाला नाही.अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

वेगळा धर्म म्हणून मान्यता जंतरमंतरवर जोरदार आंदोलन

नवी दिल्ली – लिंगायत समाजाला हिंदू धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, या मागणीसाठी आज दिल्लीच्या जंतरमंतरवर लिंगायत समाजाने जोरदार आंदोलन केले....
Read More
post-image
मुंबई

ठाणे विभागात वर्षभरात शिवशाहीचे 26 अपघात

ठाणे- प्रवाशांना वाजवी दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बस आणल्या तरी एसटीच्या ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात 26 अपघात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात एमआयएमचा मूकमोर्चा आणि धरणे आंदोलन

सोलापूर – गोपालसिंह समिती, सल्पर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाने मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या शिफारसी केल्या होत्या. मात्र त्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही. या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या लेख

(वृत्तविहार) नव्या गव्हर्नरांचा कस लागणार

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून शक्तीकांता दास यांची तातडीने निवड केली गेली. कारण पुढच्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची महत्वाची बैठक होणार आहे त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचा...
Read More