१५ ऑगस्टला मुंबईत ‘अल्ट्रा रन’ – eNavakal
मुंबई

१५ ऑगस्टला मुंबईत ‘अल्ट्रा रन’

मुंबई – येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या ‘मुंबई अल्ट्रा -१२ तास रन’च्या पाचव्या पर्वामध्ये सुमारे पाचशे स्पर्धक आणि त्यांना उत्तेजन देण्यासाठी दोन हजार समर्थक धावणार आहेत. जे धावूच शकत नाहीत, त्यांनी किमान १२ मिनिटे तरी धावावे, यासाठी ‘वेलनेस ओव्हर इलनेस ’ हा संदेश यानिमित्ताने देण्यात येणार आहे.

ऐंशी वर्षांचे डॉ. पी. एस्. रमाणी हे या ‘रन’चे ब्रॅण्ड अम्बेसेडर असून ते स्वत: १२ तास धावणार आहेत. धावण्याच्या या कालावधीत धावपटूंना त्यांच्या गरजेनुसार खाण्यापिण्याची आणि काही काळ विश्रांती घेण्याची देखील मुभा राहणार आहे. १२ तासांचे हे अंतर ४२.२ किलोमीटरचे आहे. शिवाजी पार्क येथून पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होणार्‍या या मॅरेथॉन रनचा सायंकाळी पाच वाजता समारोप अपेक्षित आहे. स्पर्धा पूर्ण करणार्‍या प्रत्येकाला पदक देण्यात येणार आहे. धावपटूंना आवश्यकता भासल्यास उपाचारासाठी धावण्याच्या मार्गांवर तज्ज्ञ डॉक्टर आणि १०८ रुग्णवाहिकाही असणार आहेत.

‘एडलवाइज ग्रुप’चे पाठबळ लाभलेल्या या स्पर्धेतील प्रवेश शुल्काचा निधी कर्करोगग्रस्तांवर उपचार करर्‍यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला देण्यात येणार असल्याचे ‘मुंबई अल्ट्रा -१२ तास रन’चे संचालक सॅविओ डिसोझा यांनी सांगितले. रेसच्या वैद्यकीय संचालिका गायत्री ठाकूर यांनी सांगितले की, धावण्याच्या वेळी एखाद्याला थकवा जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना स्पर्धेतून माघार घेणे बंधनकारक राहील. यावेळी उषा सोनम यांनी धावण्याऐवजी चालत का होईना, पण स्पर्धा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

तेलंगणात नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

हैदराबाद – तेलंगणा राज्यातही कोरोनाचे संकट वाढले आहे. तिथे नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी सुदैवाने गेल्या 24 तासांमध्ये एकाची मृत्यू झालेला नाही....
Read More
post-image
देश

डॉक्टरांवर हल्ला झालेल्या इंदुरमध्ये सापडले १० कोरोना रुग्ण

इंदूर – मध्य प्रदेशातील मिनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदुरमध्ये कोरोनाचे नवे १० रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी डॉक्टरांचे एक पथक या...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोना संक्रमणापासून आदिवासी पट्टा सुरक्षित

जळगाव – राज्याच्या विविध भागात कोरोनाच्या संक्रमण प्रक्रियेने थैमान घातले असताना जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासी पट्टा मात्र सध्या तरी कोरोना संक्रमणापासून सुरक्षित...
Read More
post-image
देश

कोरोनाची महामारी ठरली वरदान, प्रदूषित यमुना नदी झाली शुद्ध व साफ

नवी दिल्ली – कोरोनाची महामारी दिल्लीतील यमुना नदीसाठी वरदान ठरली आहे. आग्र्यापासून दिल्लीपर्यंत यमुना नदी ही गटारगंगा बनली होती. मात्र कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन...
Read More
post-image
मनोरंजन

कोरोनावर मात करून गायिका कनिका कपूर 18 दिवसांनी घरी परतली

नवी दिल्ली – बॉलिवूड गायिका कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. पण आता 18 दिवसांच्या उपचारानंतर कनिका एकदम ठणठणीत झाली असून...
Read More