११ ऑक्टोबरला वाराणसीत मोदी-जिनपिंग भेट – eNavakal
देश विदेश

११ ऑक्टोबरला वाराणसीत मोदी-जिनपिंग भेट

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची 11 ऑक्टोबरला वाराणसीत भेट होणार आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर तीन दिवसांच्या चीन दौर्‍यावर आहेत त्यावेळी त्यांनी चीनचे परदेशमंत्री वांग यी यांची भेट घेतली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. ही भारत आणि चीनची दुसरी भेट असेल, यापूर्वी 2018 मध्ये वुहानमध्ये अशी अनौपचारीक बैठक झाली होती. वुहानमध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. यावेळी चीनने मानसरोवर यात्रा अधिक विस्तारीत करण्याचा मानस बोलून दाखवला. तसेच भारताच्या उत्पादनांना चीनच्या बाजरपेठेत स्थान मिळून देण्यावरदेखील चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये काही मुद्दांवरून मतभेद आहेत. मात्र तरी देखील दोन्ही देशांमध्ये मतभेद विसरून व्यापारी संबंध प्रस्थापीत करण्याची आमची तयारी आहे असे चीनच्या परदेश मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नरेेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण! विक्रम भावेचा जामीन फेटाळला

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेल्या विक्रम भावेचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र...
Read More
post-image
News महाराष्ट्र

विक्रमगडमधील पूल मोजताहेत शेवटची घटका

विक्रमगड – तालुक्यातील अनेक वर्षापासूनचे पूल मोडकळीस आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटीशकालीन विक्रमगड-गडदे मार्गावरील तांबडी नदीचा पूल, साखरे गावातील देहेर्जे नदीवरील पूल, नागझरी बंधारा...
Read More