१११ कोटींच्या नोटा अद्याप बदलून दिल्या नाहीत, सुप्रीम कोर्टात चिदंबरम लढणार केस! – शरद पवार – eNavakal
न्यायालय मुंबई राजकीय

१११ कोटींच्या नोटा अद्याप बदलून दिल्या नाहीत, सुप्रीम कोर्टात चिदंबरम लढणार केस! – शरद पवार

मुंबई – सहकारी बँकांना नोटा अद्याप बदलून न देण्यात आल्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गुजरात, कर्नाटक आदी राज्यातील सहकारी बँकातही काही नोटा बदलून देण्यात आल्या नाहीत. केरळ, तमिळनाडू, युपी येथेही प्रभावी सहकारी बँका आहेत. या नोटांबाबत तीनवेळा केवायसी तपासणी करण्यात आली. आरबीआयच्या पथकानेच तपासणी केली. त्यात काही वावगे सापडले नाही. शेड्युल बँकांच्या नोटा बदलून देण्यात आल्या. मात्र जिल्हा सहकारी बँकांतील नोटा बदलून देण्यात आल्या नाहीत. 30 जानेवारी 2018 ला नोटा बदलून देणार नसल्याच्या सूचना सहकारी बँकांना देण्यात आल्या आहेत.
या नोटा नष्ट कराव्यात आणि ताळेपत्रकात तो तोटा म्हणून दाखविण्याचा सल्ला सहकारी बँकांना देण्यात आला. राज्यात सहकारी बँकांच्या सुमारे 111 कोटींच्या नोटा अद्याप बदलून देण्यात आल्या नाहीत. या प्रकरणातून सरकारचे एकूण धोरण स्पष्ट होते. संसद अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असून थेट न्यायालयात मुद्दा मांडू असा इशारा देत याबाबतचा खटला पी. चिदंबरम लढवतील, असे पवारांनी सांगितले. आर्थिक निकषांसोबत शेतकी व्यवसाय करणार्‍यांना शेतकरी म्हणून आरक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास शेतकर्‍यांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. मात्र मागास शेतकर्‍यांनाच आरक्षण द्यावे सधन वगैरे शेतकर्‍यांबाबत हा विषय नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दिवसेंदिवस शेती कमी होत चालली आहे. 82 टक्के लोकांकडे 2 एकरपेक्षा कमी शेती. तर 70 ते 72 टक्के शेतजमीनीला पाणी नाही. त्यामुळे आर्थिक निकषासोबत शेतकी व्यवसाय करणार्‍या वर्गाला शेतकरी म्हणून आरक्षण द्यायला हवे. तयारी न करता शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली. त्यामुळे दिवसेंदिवस लाभार्थी आणि निधीचा आकडा कमीकमी होत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More