होळ्या पेटवून धूर करा, पाऊस पडेल सोलापूर जिल्हाधिकार्‍यांचा आदेश, अंधश्रद्धेचा कळस – eNavakal
महाराष्ट्र

होळ्या पेटवून धूर करा, पाऊस पडेल सोलापूर जिल्हाधिकार्‍यांचा आदेश, अंधश्रद्धेचा कळस

पंढरपूर – कायम दुष्काळी छायेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिना संपत आला तरीही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील 1024 गावांमध्ये प्रदूषण निर्माण करणार्‍या लाकूड व मिठाच्या होळ्या पेटवून प्रचंड धूर करून पाऊस पाडण्याच्या सरकारी ‘भोंदू’ प्रयोगाचे आयोजन केले होते, मात्र अंधश्रद्धेचा कळस करणार्‍या या प्रकारावर चौफेर टीका होऊ लागली. त्यामुळे अखेर पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याचे लक्षात आल्याचे कारण पुढे करत हा प्रयोग जिल्हाधिकार्‍यांनी रद्द केला.

पर्यावरणाचा समतोल बिघवडणार्‍या या होळ्या पेटवण्यासाठी गावोगावच्या तलाठी, मंडल अधिकारी यांना तोंडी सूचना दिल्या होत्या. शनिवारी दुपारी चार वाजता या होळ्या पेटवण्याचे नियोजन केले होते, मात्र आज अचानक जिल्हाधिकार्‍यांचा निरोप आल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
या होळीसाठी गावोगावच्या तलाठी, सर्कल व गावच्या पुढारी मंडळींनी लाकूडफाटा तोडून, फुटके टायर, मिठाची पोती विकत आणून जय्यत तयारी केली होती. सोलापूर जिल्हा कायम दुष्काळी छायेत असलेला जिल्हा आहे. यावेळी तर सरासरीच्या केवळ 40 टक्के इतकाच पाऊस पडला आहे. पाऊस नसल्याने ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. रब्बीचा हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. पाऊस नसल्याने जमिनीतील पाणी पातळी घटत चालली आहे. उसावरील हुमणी अळीने थैमान घातले आहे. जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण यावर्षी 110 टक्के भरले असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता नाही.

आय.आय.टी. मद्रासचे शास्रज्ञ राजीव मराठे यांनी केलेल्या प्रयोगाप्रमाणे पिंपळ, वड, लिंब आदी झाडांचे दोनशे किलो लाकूड व गावाच्या बाहेर माळरानावर छोटा खड्डा घेऊन त्यात ही होळी पेटवून द्यायची, या आगीमध्ये धूर होण्यासाठी 50 किलो मीठ टाकायचे यापासून सिल्व्हर आयोडाइडचा धूर निर्माण होऊन तो ढगात जाईल आणि 24 ते 48 तासात कृत्रिम पाऊस पडेल हे मराठे यांचे शास्र आहे. नांदेड जिल्ह्यात हा प्रयोग सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली. तर पर्यावरण व जलतज्ज्ञ अनिल पाटील म्हणाले की, कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण दरवर्षी 2 ते 3 ने वाढत असून त्याचा परीणाम हवेतील तापमान वाढण्यावर होतो. त्यामुळे पर्यावरणीय बदल ऋतूमानावर होतात आणि त्यामुळे पाऊस पडत नाही
वास्तविकता देशाच्या डोंगराळ भागात पाऊस पडतो, पठारी भागावर पावसाची वाट बघावी लागते. महाराष्ट्रात गडहिंग्लज या डोंगराळ भागात ढग फुटी होते. दरम्यान, पर्यावरणाचा र्‍हास होणारे प्रयोग जिल्हाधिकारी सारखे जबाबदार अधिकारी करीत असतील तर हे आश्चर्यच म्हणावे लागेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More