हॉकर्स झोनची जुनीच यादी प्रसिध्द केल्याने स्थायी समितीत गदारोळ, यादी रद्द करण्याची मागणी – eNavakal
News मुंबई

हॉकर्स झोनची जुनीच यादी प्रसिध्द केल्याने स्थायी समितीत गदारोळ, यादी रद्द करण्याची मागणी

मुंबई – मुंबईत फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्रातील रस्त्यांची यादी तयार करून लोकांच्या हरकती व सूचनांसाठी ठेवण्यासाठी ठेवण्यात आली. मात्र, ही यादी लोकांच्या हरकती व सूचना नोंदवण्यासाठी ठेवताना महापौर, महापालिका सभागृह आणि स्थायी समित्यांच्या माध्यमातून नगरसेवकांसमोर आणण्याऐवजी परस्पर जाहीर करण्यात आली आहे. नागरी पथविक्रेता समित्यांची निवड न करता तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार काही रस्ते वगळून हे क्षेत्र निश्चित करणे आवश्यक असताना परस्पर जुनीच यादी लोकांसमोर ठेवल्याने स्थायी समितीत आज नगरसेवकांनी गदारोळ घातला. ही यादी त्वरीत रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.
महापौर, महापालिका सभागृह तसेच स्थायी समितीला डावलून फेरीवाला क्षेत्राबाबत बनवलेल्या रस्त्यांची यादी लोकांच्या हरकती व सुचनांसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ही बाब नगरसेवकांना समजत असून प्रत्यक्षात नगरसेवकांना याची कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे एकप्रकारे संभ्रमाची स्थिती मुंबईत निर्माण झाल्याची बाब हरकतीच्या मुद्दाद्वारे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केली आहे. त्यामुळे ही यादी त्वरीत रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. याला भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी पाठिंबा दिला. 2014 मध्ये केलेल्या सर्वेमधील पात्र फेरीवाले आणि या माध्यमातून देण्यात येणारे 85 हजार फेरीवाल्यांच्या जागा यामुळे ही मुंबई ज्वालामुखीच्या तोंडावर उभी असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई महापालिका न्यायालयाचे आदेश दाखवून मुंबईकरांना फसवत असल्याचा आरोप भाजपाचे मकरंद नार्वेकर यांनी केला. तर प्रशासन नगरसेवकांना काही महापौरांनाही विश्वासात घेत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला. त्यामुळे हरकती व सूचनांसाठी जाहीर केलेली फेरीवाला क्षेत्रांची यादी रद्द करण्याची मागणी जाधव यांनी केली. मुळात जिथे दहा फुटापेक्षा मोठी पदपथ आहेत तिथेच फेरीवाला क्षेत्र बनवता येतात. परंतु घाटकोपरमध्ये एवढा मोठा पदपथच नाही. मग तिथे फेरीवाला क्षेत्र कसे बनवले? असा सवाल भाजपाचे पराग शाह यांनी केला. आठ दिवसांपूर्वी महापालिका सभागृहात आपण यावर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर चार दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. पण महापौरच हा विषय विसरले असल्यामुळे सत्ताधारी पक्ष याबाबत गंभीर नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.

बैठकीला उपायुक्त अनुपस्थित राहिल्यामुळे सभा तहकूब
फेरीवाला विभागाची जबाबदारी ही उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांच्याकडे आहे. परंतु या विषयावर मोठी चर्चा रंगलेली असताना यावर त्यांनी उपस्थित राहून माहिती द्यावी, अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली. लोकप्रतिनिधींना माहिती देण्यापूर्वी ट्विटरवरून आधीच जाहीर केली जाते, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. परंतु वारंवार निरोप पाठवूनही काही कामामुळे बैठकीला उपस्थित राहण्यास निधी चौधरींना विलंब झाला. त्यामुळे प्रशासन जाणून बुजून असे वागत असून जर नगरसेवक आणि समित्यांचा अपमान होत असल्यामुळे स्थायी समितीची सभाच तहकूब करण्यात आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश मुंबई

पेट्रोल-डिझेल आजही महागले; पाहा आजचे दर

मुंबई – सौदी अरबमध्ये झालेल्या हल्यांनंतर जगभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर आजही वाढले आहेत. राजधानी दिल्ली पेट्रोलचे दर प्रतिलिटर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

चिदंबरम यांच्या भेटीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज तिहार रुग्णालयात जाऊन ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More