हैतीला 5.9 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का ! 11 जणांचा मृत्यू – eNavakal
विदेश

हैतीला 5.9 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का ! 11 जणांचा मृत्यू

पोर्ट औ प्रिन्स- कॅरिबियन समुद्रातील हैतीला काल 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भुकंपाच्या धक्क्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य काही जण जखमी झाले आहेत. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. तसेच एक चर्च देखील पडले आहे. हैतीला 2010 मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा धक्का असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री 8 वाजून 11 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तरेकडील पोर्ट-जे-पै या ठिकाणापासून 18 किलोमीटर लांब होता. पोर्ट-जे-पै, ग्रॉस मोर्ने, चांसोल्म आणि टर्टल या परिसरात भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. ज्या इमारती कोसळल्या आहेत त्यामध्ये सेंट मायकल चर्चचा देखील समावेश आहे. हैतीसह डोमिनिक रिपब्लिक या शेजारच्या देशालाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हैती उच्च भूकंप प्रवण क्षेत्रात येणारा देश आहे. 2010 मध्ये राजधानीत झालेल्या 7.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे जवळजवळ 3 लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

ठाणे विभागात वर्षभरात शिवशाहीचे 26 अपघात

ठाणे- प्रवाशांना वाजवी दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बस आणल्या तरी एसटीच्या ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात 26 अपघात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात एमआयएमचा मूकमोर्चा आणि धरणे आंदोलन

सोलापूर – गोपालसिंह समिती, सल्पर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाने मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या शिफारसी केल्या होत्या. मात्र त्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही. या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या लेख

(वृत्तविहार) नव्या गव्हर्नरांचा कस लागणार

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून शक्तीकांता दास यांची तातडीने निवड केली गेली. कारण पुढच्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची महत्वाची बैठक होणार आहे त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचा...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुण्यात आशियाई चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून सुरू होणार

पुणे- ‘आशय फिल्म क्लब’च्या वतीने आयोजित केलेल्या नववा आशियाई चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून पुण्यात सुरू होणार आहे. 15 आशियाई देशांमधील 40 पेक्षा जास्त चित्रपटांचा...
Read More