हे ऑक्सिजन पार्लर काय आहे? – eNavakal
देश

हे ऑक्सिजन पार्लर काय आहे?

सातत्याने होणारी वृक्षतोड, दिवसागणिक वाढणाऱ्या गाड्यांची संख्या, सिमेंट कॉक्रीटच्या टोलेजंग इमारती अशा काही गोष्टींमुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होतेय. या प्रदुषणाच्या युगात आपल्याला किमान शुद्ध हवा मिळावी, असे प्रत्येकालाच वाटते. पण प्रवासात तर सोडाच, आपल्या घराच्या आसपासही शुद्ध हवा मिळणे कठीणच आहे. मात्र आता घराच्या परिसरात माहित नाही, पण प्रवासात तुम्हाला नक्कीच शुद्ध हवा मिळणार आहे. ते ही रेल्वे प्रवासात.

मध्य रेल्वेने आपल्या स्थानकांवर ऑक्सिजन पार्लर उभारण्याची मोहीम हाती घेतली आहे. या ऑक्सिजन पार्लरमुळे स्थानकाचा परिसर प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे. देशातील पहिले ऑक्सिजन पार्लर हे नाशिक रेल्वे स्थानकावर उभारण्यात आले असून लवकरच ठाणे रेल्वे स्थानकातही उभारण्यात येणार आहे.

ऑक्सिजन पार्लरमध्ये नासाकडून मान्यता प्राप्त झालेल्या १८ प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात येते. नाशिक रेल्वे स्थानकात स्नेक प्लांट, आरेलिया बुश, ड्रॅगन बांबू, चायनीज बांबू, मनीप्लँट, झामीया, झेड प्लांट, बोनझा अशी झाडं लावण्यात आली आहेत. यापैकी प्रत्येक झाड २४ तास ऑक्सिजनचा पुरवठा करून आपल्या आसपासच्या 10 बाय 10 परिसरातील हवा शुद्ध करण्याचं काम करते. विशेष म्हणजे या झाडांना 8 दिवसातून एकदाच पाणी टाकावे लागते.

नाशिक स्थानकात ऑक्सिजन पार्लरमुळे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना प्रसन्नता जाणवते. ऑक्सिजन पार्लर पाहताच प्रवासी आवर्जून त्याठिकाणी जातात. इतकेच नाही तर या पार्लरमधून प्रवाशांना रोपटे विकत सुद्धा घेता येते. प्रत्येक रोपट्याची किंमत २०० ते ५०० रुपयांपर्यंत असते. त्यामुळे रेल्वेला या पार्लरच्या माध्यमातून नफाही मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या निम फ्रिज पॉलिसी अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

विशेष म्हणजे ठाण्यापाठोपाठ कल्याण आणि दादर या स्थानकांवर ही ऑक्सिजन पार्लर उभारली जाणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती स्थिर, आयसीयूतून सामान्य कक्षात हलवले

मुंबई- कोरोनाचा संसर्ग झाल्याने लिलावती रुग्णालयात उपचार घेत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांना आयसीयूतून सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. प्रकृतीत थोडी सुधारणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पाकिस्तानची वेबसाईट हॅक, भारताचा तिरंगा फडकला

नवी दिल्ली- आज देशात स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी पाकिस्तानच्या वेबसाइट्सवरही शुभेच्छांचे संदेश दिसून आले आहेत. पाकिस्तानच्या फातिमा जिन्ना महिला विद्यापीठासह...
Read More
post-image
विदेश

९० दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करण्याचा डोनाल्ड ट्रम्पचा आदेश

न्यूयॉर्क – काही दिवसांपूर्वी अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घातली होती. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्सला ९० दिवसांत अमेरिकेतील टिकटॉकची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

अभिमानास्पद! कॅप्टन अमोल यादव यांनी बनविले भारतीय बनावटीचे पहिले विमान

मुंबई – आज भारताच्या स्वातंत्र्य दिनी मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून यावी अशी ऐतिहासिक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप येथे राहणारे कॅप्टन अमोल शिवाजी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचं एक आदर्श कुटुंब, पार्थ पवारांविषयीचा प्रश्न एका मिनिटांत सोडवतील-राजेश टोपे

जालना – ‘पार्थ पवार अपरिपक्व आहेत, त्यांच्या शब्दाला कवडीची किंमत देत नाही, असं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत वाद असल्याचं बोललं जात आहे....
Read More