हॅकरमुळे हटवलेलं ‘हे’ फिचर फेसबुकने पुन्हा आणलं! – eNavakal
आघाडीच्या बातम्या तंत्रज्ञान देश

हॅकरमुळे हटवलेलं ‘हे’ फिचर फेसबुकने पुन्हा आणलं!

मुंबई – सुरक्षेच्या कारणास्तव वर्षभरापूर्वी बंद केलेले फीचर फेसबुकने पुन्हा एकदा आणले आहे. फेसबुकने सप्टेंबर २०१८ मध्ये ‘व्ह्यू अॅज पब्लिक’ फीचर हटवले होते. या फीचरच्या मदतीने एका हॅकरने जवळपास पाच कोटी यूजर्सचे टोकन चोरी केले होते. मात्र आता फेसबुकने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व पावले उचलून हे फीचर म्हणून एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘व्ह्यू अॅज पब्लिक’ या फीचरच्या मदतीन यूजर आपलं प्रोफाईल दुसऱ्या यूजरच्या प्रोफाईलवरुन कसं दिसतं हे पाहू शकतो. फेसबुक फ्रेन्ड नसलेल्या यूजरला आपलं प्रोफाईल कसं दिसतं, हे देखली या फीचरच्या मदतीने पाहता येतं. या फीचरच्या मदतीने एका हॅकरने जवळपास पाच कोटी यूजर्सचं टोकन चोरी केलं होतं. चोरी केलेल्या टोकन्सच्या मदतीने हॅकर अकाऊंट्समध्ये जाऊ शकत होता. या त्रुटीमुळे फेसबुकचे जवळपास 9 कोटी अकाऊंट्स सुरक्षित आहे की ना हे तपासण्यासाठी लॉग बॅक करावे लागले होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या आसांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More