हृतिकचा सुपर ३० ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

हृतिकचा सुपर ३० ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

मुंबई – बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा वादात सापडलेल्या ‘सुपर ३०’ हा चित्रपटाला अखेर प्रदर्शनाचा मुहूर्त सापडला आहे. हृतिकचा हा चित्रपट आता १२ जुलै, २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. बिहारमधील शिक्षक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. गणित तज्ज्ञ असलेले आनंद कुमार हे गरीब मुलांना आयआयटीच्या परीक्षेसाठी तयार करीत आहेत, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ‘सुपर ३०’ या चित्रपटाची तारिख सांगितली आहे. ‘सुपर ३० चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख ठरली. १२ जुलै २०१९’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. ‘सुपर ३०’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, निर्मात्यांनी या चित्रपटाची काही शूटिंग राहिली असल्याचे कारण पुढे केल्याने हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता. त्यानंतर कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटामुळे हृतिकने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

Live राजकीय घडामोडी

१५.३० – राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव १५.०० – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस १४.४९ – राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More