हिवरे खुर्द येथे पुन्हा एकदा बिबट्याची मादी जेरबंद  – eNavakal
News महाराष्ट्र

हिवरे खुर्द येथे पुन्हा एकदा बिबट्याची मादी जेरबंद 

ओझर – जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथे मागील आठवड्यात ऊस तोडणी महिला कामगार वर ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला होता त्या जाधव मळ्यात पुन्हा एकदा एक बिबट्या आज पहाटेच्या सुमारास जेरबंद झाला असल्याची माहिती वनपाल अधिकारी मनिषा काळे यांनी दिली.
 मागील महिन्यात उस तोडणी कामगार महिलेवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सविता भिमराव वायसे या महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता यामुळे तेथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता तेव्हा 2 फेब्रुवारी रोजी येथून जवळच एक मादी जातीचा बिबट्या भक्षयाच्या शोधात बाहेर पडला असता जेरबंद झाला होता आणि आज पुन्हा एकदा मादी जातीचाच 4 ते 5 वर्षे वयाचा बिबट्या भक्षयाच्या शोधात बाहेर पडलेला असताना अलगद पिंजर्‍यात जेरबंद झाला.
वनमजुर सकाळी पिंजर्‍यात ठेवलेल्या बकरा काढण्यासाठी तेथे गेले असता त्यांना बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच त्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना देताच तेथे वनपाल मनीषा काळे, वनरक्षक कांचन ढोमसे या दाखल होताच त्यांनी या बिबट्यास पिंजर्‍यासह बोलेरो पिक गाडी मध्ये घेऊन माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात पाठवण्यात आले या वेळी वनपाल मनीषा काळे, वनरक्षक कांचन ढोमसे व वनमजुर यांनी विशेष परिश्रम घेतले तर स्थानिक ग्रामस्थ व सरपंच यांनी देखील वनविभागच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबई – राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे....
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

घाटी रुग्णालयात डॉक्टर परिचारिकांचे स्क्रीनिंग सुरू

औरंगाबाद – औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या निवासी डॉक्टर आणि परिचारिकांची स्क्रिनिंग घाटी रुग्णालयात करण्यात येत आहे. कोरोनाच्या 3...
Read More
post-image
देश विदेश

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस यांची प्रकृती खालावली, पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस

लंडन – १० दिवसांपूर्वी बोरिस यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर नियमित चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात नेले असता प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात हलवण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

ज्योतिबा डोंगराचे सर्व रस्ते सील

कोल्हापूर – दरवर्षी आज ज्योतिबाची चैत्र यात्रा सुरू होते. हजारो भाविक आजच्या दिवशी डोंगरावर येतात. मात्र आज केवळ मोजक्या पुजाऱ्यांनी पूजा केली. कोरोनामुळे ज्योतिबाच्या...
Read More