हिरव्या रंगासमोर मोदींचा रंगही टिकणार नाही: असदुद्दीन ओवेसी – eNavakal
देश राजकीय

हिरव्या रंगासमोर मोदींचा रंगही टिकणार नाही: असदुद्दीन ओवेसी

हैदराबाद – आमच्या हिरव्या रंगासमोर ना नरेंद्र मोदींचा रंग टिकेल ना काँग्रेसचा. आमच्या हिरव्या रंगासमोर कोणीही तग धरु शकत नाही, असे विधान एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. आम्ही जेव्हा हिरवा रंग परिधान करु त्यावेळी सारे काही हिरवेच होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी वादग्रस्त विधान केले. तुम्ही काहीही करा, पण आम्ही जेव्हा हिरवा रंग परिधान करु, त्यावेळी सगळीकडे फक्त हिरवा आणि हिरवाच रंग दिसेल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमधील मंदिरांना भेट देण्याच्या सत्रावरुनही त्यांनी टीका केली. राहुल गांधी गुजरातमध्ये मंदिरांना भेट देत आहेत, मग ते मशिदीत का नाही गेले, असा सवाल उपस्थित करत राहुल गांधींनी मुस्लिमांकडे दुर्लक्षच केले, असा आरोप ओवेसी यांनी केला. शनिवारी देखील राहुल गांधी यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली. गुजरात निवडणुकीत राहुल गांधी यांनी जवळपास २७ मंदिरांना भेट दिली आहे. यापार्श्वभूमीवर ओवेसी बोलत होते. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसने मुस्लिम मतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. असं करुन ते निवडणुका जिंकू शकतील, पण लोकशाहीच्या दृष्टीने हे घातक असल्याचे मत त्यांनी मांडले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळो! पुण्यात पुरुषांनी वटवृक्षाला मारल्या फेऱ्या

पुणे – आज राज्यभरात वटपौर्णिमेचा उत्साह आहे. आजच्या दिवशी वडाच्या झाडाला दोरी बांधून सात फेऱ्या मारतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी आजच्या दिवशी...
Read More
post-image
देश

नेपाळच्या शाळांमध्ये चीनी भाषेची सक्ती

काठमांडू – नेपाळमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चीनी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात अआले आहे. सध्या चीन आणि नेपाळ हे दोन देश अधिक जवळ येत असून भाषा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आपल्या १८ खासदारांसह आज अयोध्येत पोहोचले. रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More