हिमाचल प्रदेशात गुरुवारी मतदान  – eNavakal
देश राजकीय

हिमाचल प्रदेशात गुरुवारी मतदान 

हिमाचल प्रदेश :
हिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी  विधानसभेच्या  ६८ जागांसाठी निवडणूक होणार असून आज सायंकाळी ५ वाजल्यापासून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यानंतर राज्याबाहेरून आलेल्या नेत्यांना , पक्ष समर्थकांना आणि प्रचार प्रतिनिधींना विधानसभा क्षेत्रात थांबण्याची परवानगी नसेल असे निवडणूक आयोगाचे अधिकारी पुष्पेंद्र राजपूत यांनी सांगितले.
सध्या सत्तेत असलेल्या  काँग्रेसच्या सरकारची मुदत ७ जानेवारी २०१८ला संपत आहे. २०१३ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पार्टीने  ३६ जागांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. तर भाजपला केवळ  २७ जागा मिळवता आल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेससमोर आपल्या जागा राखण्याचे आव्हान आहे. तर भाजपच्या प्रचारासाठी हिमाचलमध्ये खुद्द पंतप्रधान मोदी उतरले होते आणि राज्यात सत्ता मिळवण्यास भाजपदेखील सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं असून विधानसभा निवडणुकीच्या आधीचे शेवटचे अधिवेशन आहे. आज पहिल्याच दिवशी आक्रमक होत विरोधक अधिवेशनात महत्त्वाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वीरेंद्र कुमार सतराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष! अधिवेशन सुरू

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सिंहासनकार अरुण साधू

सिंहासनकार अरुण साधू यांची आज जयंती. त्यांचा जन्म १७ जून १९४१ साली झाला. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

उन्हाळ्याची सुट्टी संपली! आज शाळेचा पहिला दिवस

मुंबई – उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी आज शाळेत जाण्यास सज्ज झाले आहेत. विदर्भ वगळता आज १७ जूनपासून राज्यभरातील शाळांमध्ये पहिला तास भरणार आहे. नवा...
Read More
post-image
दहशतवाद देश

अनंतनागमध्ये चकमक! दहशतवादी लपल्याची शंका

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये आजही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली असून अनंतनाग भागात दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. जावानांनी या भागात आणि आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम...
Read More