हिन्दू नववर्ष; कल्याणमध्ये साकारणार कचरा समस्येवर चित्ररथ – eNavakal
उपक्रम मुंबई

हिन्दू नववर्ष; कल्याणमध्ये साकारणार कचरा समस्येवर चित्ररथ

कल्याण – कल्याण डोंबिवलीमध्ये गुढ़ीपाडव्या निमित्त निघणाऱ्या नववर्ष यात्रेची तैयारी जोरात सुरु आहे, त्याच वेळी कल्याण पच्छिमेस असणाऱ्या कचरा आणि डंपिंग ग्राउंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याला वाच्या फोडण्यासाठी नववर्ष यात्रेत या प्रश्नावर चित्ररथ काढण्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते मदन दराडे यानी जाहिर केले आहे

कल्याण शहर गेल्या 2 दशकात अतिशय झपाट्याने वाढले मात्र त्यादृष्टिने कचरा, पाणी आणि सांडपाणी यांचें नियोजन करणे गरजेचे होते ते केले गेले नाही, त्यामुळे कधी काळी शहराच्या बाहेर वाटणारे डंपिंग ग्राउंड हे शहराच्या मध्यभागी येवून ठेपले आहे. या डंपिंग ग्राउंड मुळे येथील सुमारे दीड लाख वस्ती प्रभावित होत आहे. कल्याण शहरात प्रवेश करताच सर्वात आधी दुर्गाड़ी पुलापासुनच नाकाला रुमाल लावावा लागतो, त्यापरिसरात गाड़ी 10 मिनिटे थांबवली तर गाड़ीवर चिकट थर जमा होतो, तीच अवस्था नागरिकांची देखील आहे, लगेच अंगाला चिकटपणा जाणवू लागतो. त्यात डंपिंग ग्राउंडला आग लागणे नेहमीचे झाले आहे. गेल्या एका आठवड्यात 4 वेळा आगी लागल्या त्याचा धुर आणि दुर्गन्धी कल्याण स्टेशनपर्यंत जाणवली, आज सुद्धा आयुक्त आणि महापौर यानी आग आणि दुर्गन्धी आटोक्यात आणन्यासाठी एक आठवड्याची मुदत मागितली आहे.
कल्याण पूर्वेतील लोकांनी ज्यानी खाड़ी किनारा, मोकळे वातावरण समजून जागा आणि घरे घेतली ते आता दिवस रात्र नरक यातना भोगत आहेत  हिन्दू नववर्ष यात्रेत डंपिंग प्रश्नावर चित्ररथ म्हणजे गेली 25 वर्ष सत्तेत असणाऱ्या सेना-भाजपच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगण्या सारखेच आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

विदर्भात पावसाची हजेरी! वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

नागपूर- मागील 24 तासांमध्ये विदर्भात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून गेल्या 24 तासात वर्धा जिल्ह्यात 116 मिलीमीटर एवढा सर्वाधिक पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाकडून...
Read More
post-image
News विदेश

आज भारत-पाकिस्तान पुन्हा मुकाबला

दुबई- एशिया चषक क्रिकेट  स्पर्धेत उद्या भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा मुकाबला रंगणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गटातील सामन्यात हे दोन संघ बर्‍याच...
Read More
post-image
News मुंबई

गांधी जयंतीला ’सेवाग्राम’मध्ये काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी

मुंबई- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार

मुंबई- मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-2034 सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 हे शासनाच्या मंजुरीने 01...
Read More
post-image
क्रीडा विदेश

पाकिस्तानने अफगाणिस्तानची विजयी दौड रोखली

अबुधाबी – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणार्‍या अफगाणिस्तान संघाची विजयी दौड अखेर पाकिस्तानने सुपर-4 मधील पहिल्या लढतीत रोखली. अगोदर गटातील दोन्ही...
Read More