हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा – eNavakal
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता. नवलखा हे काश्मीर येथे सत्यशोधन पडताळणी समितीच्या वतीने एका कामासाठी गेले होते. तर माओवाद्यांकडे काम करत असताना नवलखा हे सरकारच्यावतीने शांतता दूत म्हणून काम पाहत होते. त्यामुळे अशी व्यक्ती देशाविरोधात कशी कारवाई करू शकते, असा सवाल अ‍ॅड.युग चौधरी यांनी आज उपस्थित केला. नवलखा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अ‍ॅड. चौधरी यांनी आज युक्तीवाद पूर्ण केला.
भीमा-कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा यांनी हायकोर्टात अर्ज केला. हायकोर्टाने हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. परंतू 12 नोव्हेंबरपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. ही मुदत संपल्याने त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे नवलखा यांनी अ‍ॅड. युग चौधरी यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज केला. त्या अजार्वर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर आज सुनावणी झाली.
यावेळी अ‍ॅड. चौधरी यांनी बाजू मांडताना नवलखा यांच्या विरोधातील सर्व कागदपत्रे हे बंद लिफाफ्यात न्यायलयात सादर करण्यात येतात. त्यामुळे आम्हाला त्यावर बाजू मांडता येत नसल्याचा दावा केला. तसेच नवलखा हे काश्मिर येथे सत्य शोधन समितीच्यावतीने गेले होते. नवलखा यांच्या पुस्तकांची अनेक मान्यवरांनी दखल घेतली असून नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनीही स्तुती केली आहे. अशी व्यक्ती देशाविरोधात कशी कारवाई करू शकते, असा सवाल उपस्थित करत चौधरी यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १,१३२, पुण्यात २,७२४ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख २८ हजार ६४२ वर

मुंबई – राज्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाचे १३ हजार १६५ नवे रुग्ण आढळले, तर ३४६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. तसेच दिवसभरात ९ हजार ११...
Read More
post-image
मनोरंजन

नैराश्याचा धंदा करणाऱ्यांना जनतेने आरसा दाखवला, कंगनाचा दीपिकाला टोला

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. त्यातच आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने कंगनाने पुन्हा एकदा बॉलीवुड विश्वाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईकरांना दिलासा, २० टक्क्यांवरून पाणीकपात १० टक्क्यांवर

मुंबई – मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांवर करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपासून...
Read More
post-image
महाराष्ट्र

देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी

मुंबई – राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार पार

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ४२७ जणांना गेल्या २४...
Read More