हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा चकमकीत खात्मा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा चकमकीत खात्मा

श्रीनगर – भारत पाकीस्तान सीमारेषेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरु आहे. कुपवाडा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आणि  या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना  यश आले आहे. या दोन दहशतवाद्यांमध्ये एक हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून मन्नान वाणीने पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला. आम्हाला भारतीय असोत किंवा काश्मिरी नागरिक असोत कोणालाही ठार करण्यात काहीही स्वारस्य नाही, जे आम्हाला दहशतवादी म्हणतात त्यांनी एक तर त्यांची पाठ्यपुस्तके बदलावीत किंवा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा म्हणजे लढणे हे आमचे काम नसून ती आमची गरज आहे हे आमच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या लक्षात येईल असेही मन्नान वाणीने त्याच्या पत्रात म्हटले होते.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई – मुंबईतील खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More