हिंमत असेल तर नारायण राणेंनी स्वतः लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी – eNavakal
News महाराष्ट्र

हिंमत असेल तर नारायण राणेंनी स्वतः लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी

रत्नागिरी – हिंमत असेल तर स्वतः नारायण राणे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असे थेट आव्हान खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना दिले आहे. काल सायंकाळी वाटद येथे शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, उद्योजक अण्णा सामंत, किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, जिल्हा महिला आघाडीच्या सौ.शिल्पा सुर्वे आदि पदाधिकारी व महिला संघटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विनायक राऊत पुढे म्हणाले की, कोण दिडफुट्या आला त्याला उत्तर देण्यासाठी आजची आमची सभा नाही. चिलटे खूप येतील पण तुम्ही बिथरू नका. ज्या शिवसेनेने नारायण राणेंचा उध्दार केला, तीच शिवसेना त्याची अधोगती करेल. तसेच हिंमत असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी स्वतः शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान राऊत यांनी दिले. आणखी खुमखुमी असेल तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More