हिंदू महिला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार? – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय विदेश

हिंदू महिला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार?

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदू महिला अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शुक्रवारी लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या मेडट्रॉनिक परिषदेत भारतीय वंशांच्या डॉक्टर संपत शिवांगी यांनी तुलसी गबार्ड यांची ओळख करून देत 2020 मधील राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. हवाई मतदारसंघातून चारवेळा सातत्याने निवडून आलेल्या तुलसी गबार्ड यांना डेमोक्रॅटिक पक्षातही मानाचे स्थान आहे.

मेडट्रॉनिक परिषदेत हवाई येथून तुलसी यांनी सभेला संबोधित केले. मात्र, तुलसी यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत नाताळादरम्यान निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या निर्णयानंतर पुढील वर्षी पक्षाकडून याबाबत घोषणा करण्यात येणार आहे. तुलसी आणि त्यांचे समर्थक भारतीय वंशांच्या अनेकांशी संपर्क साधत असून निवडणुकीसाठी किती निधी उभा करता येईल याचा अंदाज घेत आहेत. त्यानंतर निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले. अनेक भारतीय वंशांच्या नागरिकांनी 2020 च्या निवडणुकीत तुलसी यांच्यासाठी प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

गडचिरोलीत चकमक; २ नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली – गडचिरोलीतील ग्यारापत्ती गावात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नरकसा जंगल परिसरात सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान...
Read More
post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
महाराष्ट्र

वसई-विरारमध्ये मुसळधार; अनेक रस्ते पाण्याखाली

मुंबई – मुंबई उपनगरासह परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी वाहतूककोंडी होण्यासही...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More