हिंदू धर्म स्वीकार, मगच लग्न करेन! प्रेयसीची प्रियकराला अट – eNavakal
देश

हिंदू धर्म स्वीकार, मगच लग्न करेन! प्रेयसीची प्रियकराला अट

सुरत – माझ्याशी लग्न करायचे असल्यास हिंदू धर्म स्वीकार आणि मांसाहार सोडून दे, अशी अट एका हिंदू मुलीने आपल्या प्रियकराला घातली आहे. तसे प्रतिज्ञापत्रच तिने पोलीस ठाण्यात दाखल केले आहे. तिचा प्रियकर मुस्लीम धर्मीय आहे. त्यामुळे यातून काय मार्ग काढायचा असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.

दरम्यान, हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. तरुणीच्या नातेवाईकांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसात केली. तीन दिवसांनी पोलिसांनी दोघांना शोधले. मात्र दोघेही आपल्या लग्नाच्या निर्णयावर ठाम होते. दोघांनी लग्नासाठी नाव नोंदणीही केली होती. मात्र या तरुणीने प्रियकरासमोर अशी एक अट ठेवली आहे की, त्याने ती पूर्ण न केल्यास त्याच्याशी लग्न करणार नाही, असे तिने म्हटले आहे. आपल्या प्रियकराने हिंदू धर्माचा स्वीकार करावा, असे प्रतिज्ञापत्र तिने पोलीस ठाण्यात सादर केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अंधाराचा फायदा घेत औरंगाबादमध्ये दगडफेक

औरंगाबाद – औरंगाबादमधील भारत नगर भागात काल रात्री दगडफेकीची घटना घडली. त्यात एका महिलेचे डोके फुटले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार, नागरिकांनी लाइट्स बंद केल्या होत्या....
Read More
post-image
देश

५ मिनिटांत विजेच्या मागणीत ३१,७०० मेगाव्हॅटची मोठी घट

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री ९ वाजता ९ मिनिटे विजेचे दिवे बंद करून पणत्या, मेणबत्त्या, स्टॉर्च, मोबाईल फ्लॅश सुरू करण्याचे...
Read More
post-image
देश

ओडिशात पोस्टमनला ‘कोरोना’ची लागण

भुवनेश्वर – देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून आता ओडिशामध्ये एका पोस्टमनला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पोस्टमनला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट...
Read More
post-image
विदेश

कोरोनाचा ब्रिटनला जबरदस्त फटका, 1 कोटी 40 लाख लोक दारिद्र्यरेषेखाली

लंडन – एकेकाळी ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता त्या इंग्लंडला कोरोनाच्या महामारीने पार कंगाल करून सोडले आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक अरिष्ट ओढावले आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र

हत्या व बलात्काराचे गुन्हे तब्बल ९० टक्क्यांनी घटले

नवी दिल्ली – देशभरातील अनेक प्रमुख शहरात लॉकडाऊनच्या काळात हत्या आणि बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल ९० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.तसेच चोरी,...
Read More