हिंदू देवतांचा अपमान! Amazon विरोधात तक्रार दाखल – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

हिंदू देवतांचा अपमान! Amazon विरोधात तक्रार दाखल

नवी दिल्ली – सुप्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग कंपनी अॅमेझॉनने हिंदू देवतांचा अपमान केल्याने ग्राहकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. नोएडाच्या एका व्यक्तीने धार्मिक भावनांचा अपमान केल्याचा आरोप लावत अॅमेझॉनविरोधात एफआयआर दाखल केली आहे. ई-कॉमर्स साईट अॅमेझॉनवरून हिंदू देवी-देवतांचे चित्र असलेल्या टॉयलेटची, बुटाची, आणि अन्य वस्तूंची विक्री केली जात आहे. याला भारतीय नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. योग गुरु बाबा रामदेव यांनीदेखील अॅमेझॉनवर जोरदार टीका केली आहे. अनेक ग्राहकांनी अॅमेझॉन डिलीट करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

नोएडाचे पोलीस उपाध्यक्ष पियुषकुमार सिंह यांनी याबाबत सांगितले की, विकास मिश्रा नामक व्यक्तीने अॅमेझॉनविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत, ऑनलाईन शॉपिंग कंपनी अॅमेझॉनवर काही अशा टॉयलेटचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत की, ज्यांवर हिंदू देवी-देवतांचे फोटो आहेत, हा हिंदू धर्माचा अपमान आहे, असे म्हटले आहे. याप्रकरणी कलम १५३ ए अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More