हिंदुत्ववाद्यांच्या धमक्यांमुळे ह्युमन्स ऑफ हिंदुत्व फेसबुक पेज केले बंद – eNavakal
ट्रेंडिंग

हिंदुत्ववाद्यांच्या धमक्यांमुळे ह्युमन्स ऑफ हिंदुत्व फेसबुक पेज केले बंद

नवी दिल्ली – ह्युमन्स ऑफ हिंदुत्व हे फेसबुकवरील लोकप्रिय पेज काही हिंदुत्ववाद्यांनी दिलेल्या धमक्यांमुळे बंद करण्यात आले आहे. काल गुरुवारी या पेजच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरने हा निर्णय घेतला. विडंबनामध्ये माहीर असलेल्या या पेजकर्त्याचा फोन नंबर काही माथेफिरूंच्या हाती लागल्याचे एका पत्रकाराने ट्विट केले. अ‍ॅडमिनिस्ट्रेटरला ठार मारण्याच्या धमक्या या फोनवर देण्यात आल्या. पत्नी व मुलांची आपल्याला चिंता वाटत असल्याने आपण हे पेज बंद करत आहोत असे त्याने आपल्या पत्रकार मित्राला सांगितले. या देशात कुणाला विनोद समजत नाही असे मत खेदाने एका पत्रकाराने या प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केले आहे. ह्युमन्स ऑफ हिंदुत्व या पेजला एक लाखापेक्षा जास्त लाइक्स होते. धार्मिक दहशतवाद, नैतिकतेचा आग्रह धरणारे स्वयंघोषित नेते, गोरक्षक आणि अंधश्रद्धा यांच्याविरोधात ह्युमन्स ऑफ हिंदुत्व सातत्याने उपहासात्मक लिखाण करत असे. मी स्वत:हून पेज बंद करत आहे, मला बॅन करण्यात आलेले नाही असे त्याने म्हटले आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असून मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही असेही अ‍ॅडमिनिस्ट्रेटरने नमूद केले आहे. मी मध्यमवर्गीय आहे, भाजपाशासित राज्यात राहतो आणि मला राजकीय पाठबळ नाही असे सांगत या पेजकर्त्याने पेज बंद करण्याचा मार्ग निवडला आहे.
गौरी लंकेश वा अफ्रझुल खानच्या मार्गाने जाण्याची माझी इच्छा नसल्याचेही त्याने म्हटले आहे. तसेच स्वत:पेक्षा आपण कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी हा मार्ग निवडत असल्याचे त्याने म्हटले आहे. डेव्हिड विरुद्ध गोलिएथ ही लढत जिंकल्याबद्दल हिंदुत्वाचे अभिनंदन असेही त्याने नमूद केले आहे. हे पेज बंद करण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाहीये. या आधी सप्टेंबरमध्येही ट्रोल्सला वैतागून हे पेज बंद करण्यात आले होते. मात्र, वाचकांनी प्रचंड प्रमाणात अनुकूल प्रतिसाद दिल्यानंतर व पेज बंद न करण्याचे आवाहन केल्यानंतर पेजकर्त्याने काही काळ पेज सुरू ठेवू असे सांगत वाचकांच्या विनंतीचा मान राखला होता. मात्र, आता त्यांचा फोन नंबर विरोधकांच्या हाती लागल्याने व जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नरेेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण! विक्रम भावेचा जामीन फेटाळला

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेल्या विक्रम भावेचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र...
Read More
post-image
News महाराष्ट्र

विक्रमगडमधील पूल मोजताहेत शेवटची घटका

विक्रमगड – तालुक्यातील अनेक वर्षापासूनचे पूल मोडकळीस आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटीशकालीन विक्रमगड-गडदे मार्गावरील तांबडी नदीचा पूल, साखरे गावातील देहेर्जे नदीवरील पूल, नागझरी बंधारा...
Read More