हिंदी ‘आयएनटी’ ऑक्टोबरमध्ये – eNavakal
मनोरंजन मुंबई

हिंदी ‘आयएनटी’ ऑक्टोबरमध्ये

मुंबई – हिंदी मनोरंजन क्षेत्रातल्या प्रवेशाची एक पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अस्तित्व, आय.एन.टी आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या गटासाठीची हिंदी एकांकिका स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा रविवार ७ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा संपन्न होईल.

स्पर्धेचे यंदाचे तेरावे वर्ष असून संपूर्ण महाराष्ट्रात खुल्यागटासाठी होणारी ही एकमेव हिंदी एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकांची नाटके किंवा मुळ एकांकिका हिंदी तसेच गुजराती व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्यासाठी अस्तित्व स्पर्धकांना विशेष साहाय्य उपलब्ध करून देते. या उपक्रमाला गेल्या सात वर्षात भरीव यश प्राप्त झाले आहे. यंदा या स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार ०२ ऑक्टोबरला तालीम स्वरूपात तर अंतिम फेरी ०७ ऑक्टोबरला संपन्न होईल.

या दोन्ही फेऱ्या सह-आयोजक असलेल्या विलेपार्ले इथल्या साठ्ये महाविद्यालयाच्या रिहर्सल हॉल/मिनी थिएटर मध्ये होणार आहेत.प्रवेश अर्ज अस्तित्वच्या www.astitva.co.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More