झिम्बाब्वेमध्ये स्फोट राजकीय संकटाच्या घडामोडींना वेग – eNavakal
गुन्हे विदेश

झिम्बाब्वेमध्ये स्फोट राजकीय संकटाच्या घडामोडींना वेग

हरारे – झिम्बाब्वेमध्ये बुधवारी सकाळी येथील सरकारी वाहिनीवर लष्कराने ताबा मिळवल्याचे वृत्त येत आहे. लष्कराकडून मात्र याचा इन्कार करण्यात आला आहे. लष्कराच्या एका प्रवक्त्याने सत्तांतरण झाल्याचे वृत्त नाकारले आहे. यादरम्यान हरारेमध्ये स्फोट देखील झाला आम्ही सत्तांतरण करत नसून उलट राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबेंच्या आसपास असलेल्या गुन्हेगारांवर निशाणा साधत आहोत. मुगाबे आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. एका जनरलने सरकारी वाहिनीवरून थेट प्रक्षेपणादरम्यान लष्कराने सत्तांतरण केले नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही देशाला आश्वस्त करू इच्छितो की, राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्षेची आम्ही हमी देतो. आम्ही केवळ त्यांच्या जवळ असलेल्या गुन्हेगांरावर निशाणा साधत आहोत. आम्ही अपेक्षा करतो की, लवकरच हे अभियान संपेल आणि परिस्थिती सर्वसामान्य होईल, असे या जनरलने म्हटले.
वर्ष 1980 मध्ये ब्रिटनपासून स्वतंत्र झाल्यानंतर झिम्बाब्वेवर राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांची सत्ता आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ‘प्रशासनावरील त्यांच्या पकडीवरून मोठे प्रश्न उपस्थित झाले होते. त्याचदरम्यान आज देशाची राजधानी हरारे येथे लष्कराने रणगाडे रस्त्यावर आणले. गेल्या काही दिवसांपासून लष्कर आणि 93 वर्षीय मुगाबे यांच्यातील तणाव वाढल्याचे दिसून आले.गेल्या काही दिवसांपासून मुगाबे यांच्या प्रकृतीच्याही तक्रारी वाढल्या आहेत. चिवेंगा यांनी उपराष्ट्राध्यक्ष एमरसन मनांगाग्वा यांची बरखास्ती मागे घेण्याची मुगाबेंकडे मागणी केली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More