हार्दिक कॉंग्रेसमध्ये येताच अश्लील फोटो व्हायरल – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

हार्दिक कॉंग्रेसमध्ये येताच अश्लील फोटो व्हायरल

गुजरात – पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर अवघ्या दोनच दिवसांत गुजरात काँग्रेसची ऑफिशियल वेबसाइट हॅक झाली आहे. या वेबसाईटवरचा महत्त्वाचा कंटेट काढून तिथे हार्दिक पटेल यांच्याविषयी अश्लील कंटेट पोस्ट करण्यात आला आहे. त्याखाली हार्दिक पटेलचे काँग्रेसमध्ये स्वागत आहे असेही लिहिण्यात आले आहे. हा प्रकार उघडकीस येताच काँग्रेसच्या आयटी सेलने ही वेबसाइट तत्काळ बंद केली. याप्रकारामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही, असे स्पष्टीकरणही कॉंग्रेसने दिले.

तसेच ‘हार्दिक पटेलच्या कॉंग्रेस प्रवेशाचा ज्यांना त्रास होतो अशा लोकांनीची ही वेबसाइट हॅक केली आहे.’ असा टोला काँग्रेस प्रवक्ते मनीष दोषी यांनी लावला आहे. दरम्यान, २०१७च्या गुजरात निवडणुकांमध्ये हार्दिक पटेलची एक कथित सेक्स टेप व्हायरल झाली होती. या टेपमुळे हार्दिक पटेलवर भरपूर टीका झाली होती. याच टेपचा स्क्रीनशॉट गुजरात काँग्रेसच्या वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

#Bond25 लशाना साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक...
Read More
post-image
देश मुंबई

कर्नाटकच्या बंडखोर आमदारावर मुंबईत उपचार

मुंबई – कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेस सुरुवात झाली आहे. मात्र बंडखोर आमदार यावेळी उपस्थित नसल्याने कुमारस्वामी सरकारवरील संकट कायम आहे. त्यातच मुंबईत असलेले कॉंग्रेसचे बंडखोर...
Read More
post-image
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More