हायपर लूपची राजकीय हाईप – eNavakal
लेख

हायपर लूपची राजकीय हाईप

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे आणि सध्या त्यांच्या कार्यालयाकडून एका बातमीची जोरदार प्रसिद्धी केली जात आहे. ती बातमी म्हणजे हायपर लूप रेल्वेबद्दल राज्यसरकार कसे उत्सुक आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबई-पुणे दरम्यान अशी हायपर लूप गाडी सुरू करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला. मुंबई-पुणे हे चार तासांचे अंतर केवळ १५-२० मिनिटांत पूर्ण करणारी ही वेगवान रेल्वे आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या हालचाली सुरू झालेल्या दिसतात. बुलेट ट्रेनला विरोध होत असताना आता या हायपर लूपचे नवे खूळ आणून मुख्यमंत्री जनमानसामध्ये आणखीनच संभ्रम निर्माण
करीत आहेत. रहदारीचे चांगले रस्ते असले पाहिजेत. अतिवेगवान नव्हेत पण किमान वेगाने धावणाऱ्या सुरक्षित वेगवान गाड्या मिळाल्या पाहिजेत. महानगरांमधली वाहतुकीची कोंडी सोडविण्याकरिता ठोस उपाय झाले पाहिजेत. विमानसेवा सर्वसामान्यांना परवडेल अश्या पद्धतीने उपलब्ध झाली पाहिजे. अशा काही माफक अपेक्षा सामान्य जनतेने ठेवलेल्या आहेत. परंतू आपण खूप मोठे विकासाचे अग्रदूत आहोत असे चित्र निर्माण करण्याकरिता अशा या वेगवान रेल्वे गाड्यांचे प्रकल्प आणण्याचा मोह या मंडळींना होत असतो. लोकांना मुंबई-पुणे १५ मिनिटात पोहोचणे आत्तातरी अपेक्षित नाही. त्यापेक्षा मुंबई आणि पुण्यात स्टेशनपासून घरापर्यंत पोहोचण्याकरिता लागणारा दोन-दोन तासांचा वेळ कमी व्हावा एवढीच प्रबळ इच्छा आहे. या मूलभूत सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते आणि आता ज्याची गरज नाही अशा गोष्टी विकासाच्या नावाखाली लादल्या जातात. भारताने
जगाबरोबर राहिले पाहिजे, प्रगत देशांमध्ये असलेल्या सोयी-सुविधा आपल्याकडेही आल्या पाहिजेत याबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतू आपल्या देशाची लोकसंख्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक रचना पाहून या अशा अतिभव्य विकास योजनांचा विचार केला पाहिजे. ज्या देशात ४५% लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात. ज्या देशातील माणासाचा सरासरी दैनंदिन रोजगार २०० रूपयेदेखील नाही किंवा जगभर आज ज्या माहिती तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर होत आहे, त्या तंत्रज्ञानापासून देशाचा ४०% भाग अजूनही वंचित आहे. इंटरनेटसेवा पोहोचत नाही. जिथे परदेशात मोबाईलचा ५-जी, ६-जी सारखा डेटा उपलब्ध होत असताना भारतात ४-जीचासुद्धा नीट प्रसार झालेला नाही. सरकारचाच राज्यकारभार १००% संगणकीकृत होऊ शकत नाही. म्हणजेच प्रशासनामध्ये कोणतीच गतिमानता नसताना केवळ प्रवासासाठी अतिवेगवान गाड्या आणून आपण काय करणार आहोत याचा
विचार मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. अतिवेगवान गाड्या किंवा प्रवासापेक्षाही लोकांना गतिमान राज्यकारभार हवा आहे. अर्थात तशी आधुनिक डेटासेंटर उभारण्याबाबतही अमेरिकेतल्या काही कंपन्यांशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री सांगतात. या रेल्वेमुळे दीड लाख टन कार्बनचे उत्सर्जन कमी होईल. म्हणजेच आज पुण्याला आपपल्या गाड्यांनी जाणारे लोक या रेल्वेचा वापर करतील अशी मुख्यमंत्र्यांची समजूत आहे. परंतू हे तितकेसे खरे नाही. हायपर लूप रेल्वेची राजकीय आकांक्षा एव्हढेच त्याचे वर्णन करता येते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More