हाजी अली दर्ग्याचा सविस्तर विकास आराखडा पुढील बैठकीत सादर करावा – eNavakal
News मुंबई

हाजी अली दर्ग्याचा सविस्तर विकास आराखडा पुढील बैठकीत सादर करावा

मुंबई- हाजी अली दर्ग्याचे सौंदर्यीकरण करताना भाविक तसेच पर्यटकांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा सविस्तर प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या या बैठकीस आमदार सर्वश्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, अमीन पटेल, अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आजम आदी उपस्थित होते
हाजी अली दर्ग्याचे काम करताना जी कामे तत्काळ हाती घेता येतील अशा कामांची यादी तयार करून ती सादर करावीत. तसेच ज्या कामांना सीआरझेड अंतर्गत विविध विभागांच्या परवानग्यांची आवश्यकता आहे त्याचीही स्वतंत्र यादी केली जावी असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, तातडीने जी कामे करता येतील त्यासाठी राज्य अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे बहृन्मुंबई महानगरपालिकेला शासन निधी उपलब्ध करून देईल. ही कामे करताना नावीन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी केली जावी त्यासाठी संबंधितांच्या सूचना मागवण्यात येऊन त्याचे सविस्तर सादरीकरण पुढील बैठकीत केले जावे. ही कामे करताना कोणकोणत्या विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे लागतील याचाही अभ्यास केला जावा. यासाठीचे नियम अभ्यासले जावेत. दर्ग्याला देश-विदेशातून भाविक, पर्यटक भेट देत असल्याने कामाचा दर्जा अतिउत्कृष्ट राहील याची काळजी घेतली जावी.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
मुंबई

वॉकहार्ट रुग्णालयातील 3 डॉक्टरसह २६ नर्सना कोरोनाची झाली लागण

मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई सेन्ट्रल परिसरात असलेल्या वॉकहार्ट रुग्णालयातील ३ डॉक्टरांसह तब्बल २६ नर्सना कोरोनाची लागण झाली आहे....
Read More