हसण्यावरुन झालेल्या वादातून मालाडमध्ये 18 वर्षांच्या तरुणाची हत्या – eNavakal
News मुंबई

हसण्यावरुन झालेल्या वादातून मालाडमध्ये 18 वर्षांच्या तरुणाची हत्या

मुंबई- हसण्यावरुन झालेल्या वादातून सोळा आणि सतरा वयोगटातील दोन अल्पवयीन मुलांनी धीरज गुलाबराव गुसाई नावाच्या एका अठरा वर्षांच्या तरुणाची लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी मालाड परिसरात घडली. याप्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून दोन्ही मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांनाही डोंगरी बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांनी सांगितले. इतक्या क्षुल्लक वादातून अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची हत्या केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
धीरज हा त्याच्या कुटुंबियांसोबत मालाड येथील संतोषनगर परिसरात राहतो. दोन्ही आरोपी मुले याच परिसरातील रहिवाशी असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी 12 एप्रिलला धीरज हा दुकानातून दूध आणण्यासाठी जात होता. सायंकाळी पावणेपाच वाजता तो मालाड येथील रिद्धी-सिद्धी गार्डनजवळील नवज्योतसिंग इमारतीसमोरुन जात होता. यावेळी तिथे दोन्ही अल्पवयीन मुले उभे होते, त्यातील एकाला पाहून धीरज हा हसला होता, याच कारणावरुन या दोघांनी त्याला जाब विचारला, त्यातून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि या दोघांनी त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत धीरज हा बेशुद्ध पडला होता. ही माहिती स्थानिक रहिवाशांना समजताच त्यांनी त्याला जवळच्या लाईफलाईन या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) एका छोट्या मुलीने जगभरात वादळ निर्माण केलंय आपण कधी जागृत होणारच नाही का?

मुंबईत बसणार्‍याला खूप उकडतंय, पुण्यात तर चटके असह्य होतायत, विदर्भ मराठवाड्यात सतत दुष्काळ पडतोय, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात चैत्रात पाऊस पडतोय, गारांचा मारा होतोय,...
Read More