हर्षवर्धन पाटलांचा भाजपात प्रवेश – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

हर्षवर्धन पाटलांचा भाजपात प्रवेश

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मोठ-मोठे धक्के बसत आहेत. तर सत्ताधारी भाजपा आणि शेवसेनेत मात्र जोरदार इनकमिंग सुरू आहे. आज मुंबईत भाजपाची तिसरी मेगा भरती पार पडत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईच्या चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्यासह काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आणि सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील हे देखील भाजपावासी होणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक हे वाशीमध्ये ५५ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये संध्याकाळी ५ वाजता हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. या प्रवेशासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या एकमेव महापालिकेवरसुद्धा कमळ फुलताना दिसेल.

तसेच काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघांचे पाटील यांनी सलग ४ वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नसल्याने नाराज पाटील यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. त्याचवेळी ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आज भाजपात प्रवेश केल्यानंतरही हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे मोठे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी गेल्या ५ वर्षात राज्याचा कारभार खंबीरपणे सांभाळला, तर पंतप्रधानांनी १०० दिवसांत अनेक धाडसी निर्णय घेतले, असे ते म्हणाले. तसेच आपल्या जिल्ह्यातील पाणी प्रश्न गंभीर झाला असल्याची चिंताही त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे आमदार आनंदराव पाटील यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू मानले जायचे. सातारा जिल्ह्यात खासदार रणजित निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यानंतर आता आनंदराव पाटील यांनीही काँग्रेसला रामराम केल्याने जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांचे मुंबई आणि परिसरातील उत्तर भारतीय मतदारांमध्ये वर्चस्व आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते काँग्रेसमध्ये फार सक्रियही दिसले नाहीत.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईकरांनो सावधान! आज ५२ रुग्ण नव्याने आढळले, बाधितांची संख्या ३३०

मुंबई – देशात कोरोना बाधितांचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यातही कोरोनासाठी मुंबई शहर केंद्रबिंदू ठरला आहे. कोरोनाचे मुंबईत आज नव्याने ५२ रुग्ण सापडले...
Read More
post-image
ट्रेंडिंग

पीपीई किटमध्ये नक्की काय काय असतं?

जगात जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर झाली आहे. कोरोनाचा विळखा सर्वच देशात अधिक घट्ट होत जातोय. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी प्रत्येकाच्या मनात धडकी भरवणारी आहे. वैद्यकीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

…तर रुग्णवाहिका कर्मचारी ७ एप्रिलपासून जाणार संपावर

नवी दिल्ली – कोरोनाविरोधात लढण्यासाठी आरोग्य सेवकांचा सर्वांत मोठा हात आहे. त्यामध्ये रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. मात्र काही अॅम्बुलन्स चालकाला पीपी किट मिळत नसल्याने...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सूज्ञ, पूजा-अर्चा घरात बसूनच करा- अजित पवार

मुंबई – कोरोनाचा वाढता विळखा लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग आणि जमावबंदी आणखी कठोर करण्याची गरज आहे. म्हणूनच येत्या सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

कोल्हापूर – महाराष्ट्रात एकीकडे उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना कोल्हापुरात मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुडगूस घातला आहे. अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या  पावसामुळे शेतकऱ्यांची...
Read More