‘हम आपके हैं कौन’च्या सिक्वलमध्ये वरुण-आलिया – eNavakal
मनोरंजन

‘हम आपके हैं कौन’च्या सिक्वलमध्ये वरुण-आलिया

मुंबई – राजश्री प्रॉडक्शन्स सध्या माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांनी गाजवलेल्या ‘हम आपके हैं कौन’ या सिनेमाच्या सिक्वलवर काम करत आहेत. सल्लूभाई आणि माधुरी यांच्या अगदी चांगल्या सिनेमांमध्ये या सिनेमाचा समावेश करावाच लागतो. त्यांच्यातील भन्नाट केमिस्ट्रीमुळेच अनेकांच्या मनांमध्ये या दोघांनी जागा बनवली हे विसरता येणार नाही. १९९४ साली सुपरहीट झालेल्या याच सिनेमाच्या सिक्वलमध्ये वरुण धवन आणि आलिया भट्ट यांना घेण्यात येणार आहे असं कळतंय. राजश्री प्रॉडक्शन आणि या बॅनरचे सर्वेसर्वा सूरज बडजात्या यांनी सिक्वलमध्ये या दोघांना घेण्याचं नक्की केलंय.

त्याचं झालंय असं की, राजश्री प्रॉडक्शनने फेसबुकच्या आपल्या अधिकृत अकाऊंटवर एक स्पर्धाच घेतली होती. त्यात त्यांनी प्रेक्षकांनाच विचारलं होतं की सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या जागी या सिनेमाच्या सिक्वलमध्ये ते कुणाला पाहणं पसंत करतात… आता या स्पर्धेमध्ये कितीजणांनी वरुण आणि आलिया भट्ट यांना निवडले हे कळायला मार्ग नसला तरी सूरज बडजात्या यांनी या दोघांची निवड केली आहे. त्यावरून त्यांना जास्त मतं मिळाली असावीत असं समजूया.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More