हमीद अन्सारीने दिला प्रेमात न पडण्याचा सल्ला – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

हमीद अन्सारीने दिला प्रेमात न पडण्याचा सल्ला

मुंबई – तब्बल 6 वर्षांपासून पाकिस्तान सुरक्षादलाच्या ताब्यात असलेला भारतीय तरुण हमीद अन्सारी आज मुंबईमध्ये दाखल झाला. यावेळी त्याच्यासोबत त्याचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर हमीद त्याच्या कुटुंबियांसोबत मुंबईतील घरी पोहोचला. घरी पोहोचताच हमीद अन्सारीने पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी हमीद अतिशय भावुक झाला होता. 6 वर्षांपूर्वी फेसबुकवर झालेल्या प्रेमामुळे तो पाकिस्तानात त्याच्या प्रेयसीला भेटायला अनधिकृतरित्या गेला होता. त्यामुळे त्याला पाकिस्तानी सुरक्षा दलांनी पकडले होते. त्याच्यावर बेतलेली ही आप-बीती त्याने पत्रकारांना सांगितली.ं तो म्हणाला की ’ फेसबुकवर कधीही कुणाच्या प्रेमात पडू नका. आई-वडिलांशी खोटे बोलू नका, त्यांच्याशी सगळ शेअर करा. अनधिकृतपणे कुठेही जाऊ नका. अधिकृतपणेच जा, असा सल्ला त्याने यावेळी दिला. हमीदची परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नाने सुटका झाली. भारतीय नागरिक हमीद अन्सारी याला 6 वर्षांपूर्वी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी पकडले होते. त्याला पाकिस्तानात 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याला सोडण्यात आले होते. मात्र, त्यावेळी संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे त्याला पुढचे 3 वर्षे तेथेच रहावे लागले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
महाराष्ट्र

वसई-विरारमध्ये मुसळधार; अनेक रस्ते पाण्याखाली

मुंबई – मुंबई उपनगरासह परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी वाहतूककोंडी होण्यासही...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More