हदियाला तात्काळ नजरकैदेतून मुक्त करा : सुप्रीम कोर्ट सोमवारच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय – eNavakal
News देश न्यायालय

हदियाला तात्काळ नजरकैदेतून मुक्त करा : सुप्रीम कोर्ट सोमवारच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली :  केरल येथील बहुचर्चित लव्ह जिहाद खटल्याबाबत सोमवारी सुनावणी झाली. ह्यात लवकरात लवकर हदियाला आई वडिलांच्या नजरकैदेतून मुक्त करत शिक्षण्याची मुभा दिली जावी असा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर हा निर्णय घेतला, त्याच बरोबर हदियाला पोलीस संरक्षण मिळावे असेही यावेळी कोर्टाने सांगितले. तर तिला हवे असल्यास शिक्षणासंदर्भात सरकारी मदत सुद्द्धा तिला मिळू शकते, सोमवारी तब्बल पावणे दोन तास ह्या खटल्याची सुनावणी झाली. दरम्यान हदियाला पुढील डॉक्टरी शिक्षणासाठी तामिळनाडू येथील सेलम येथे पाठवण्यात आले. तर ह्या निर्णयावर स्थगिती यावी यासाठी आई वडिलांचे प्रयत्न आहेत व ह्या खटल्याची पुढील सुनावणी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात केली जाईल

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

ठाणे विभागात वर्षभरात शिवशाहीचे 26 अपघात

ठाणे- प्रवाशांना वाजवी दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बस आणल्या तरी एसटीच्या ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात 26 अपघात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात एमआयएमचा मूकमोर्चा आणि धरणे आंदोलन

सोलापूर – गोपालसिंह समिती, सल्पर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाने मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या शिफारसी केल्या होत्या. मात्र त्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही. या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या लेख

(वृत्तविहार) नव्या गव्हर्नरांचा कस लागणार

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून शक्तीकांता दास यांची तातडीने निवड केली गेली. कारण पुढच्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची महत्वाची बैठक होणार आहे त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचा...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुण्यात आशियाई चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून सुरू होणार

पुणे- ‘आशय फिल्म क्लब’च्या वतीने आयोजित केलेल्या नववा आशियाई चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून पुण्यात सुरू होणार आहे. 15 आशियाई देशांमधील 40 पेक्षा जास्त चित्रपटांचा...
Read More