हत्येतील मास्टरमाईंड गजाआड होणे गरजेचे – मुक्ता दाभोलकरांनी व्यक्त केले मत – eNavakal
News महाराष्ट्र

हत्येतील मास्टरमाईंड गजाआड होणे गरजेचे – मुक्ता दाभोलकरांनी व्यक्त केले मत

ठाणे- पाच वर्षात झालेल्या डॉ दाभोळकर. कुलबर्गी,पानसरे आणि गौरी लंकेश या चारही हत्यांमध्ये साधर्म्य आहे. पाच वर्षात चार खून होतात. पुढेही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून खून करणार्‍यांना अटक करून भागणार नाही तर त्यासाठी हत्यांचा मास्टरमाईंड गजाआड होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळकर हिने ठाण्यात एका कार्यक्रमात व्यक्त केले. त्या मोह विद्यालयातील डॉ. दाभोळकर स्मरण दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित होत्या.

ठाण्याच्या मोह विद्यालयात कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती, मुंबई-ठाणे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि विवेकवादी चळवळीतील हवी तरुणांची साथ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मुक्ता दाभोलकर या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. या हत्या प्रकरणाच्या तपासावर उच्च न्यायालयाची नजर आहे. या हत्यांबाबत आणि आरोपी पकडण्यासाठी झालेल्या दिरंगाईबाबत न्यायालयाने स्पष्ट केले की, मारेकरी इतके दिवस बाहेर राहतात. याचाच अर्थ त्या मारेकर्‍यांना पाठबळ आहे. म्हणूनच मारेकरी आता गजाआड होताहेत. तपासाला वेगही आला आहे. मात्र मास्टरमाईंड गजाआड होण्याची गरज आहे. अमेरिकेप्रमाणे हिंसाचार करणार्‍या संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासोबतच संघटनेवरही गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. आज संघटितरित्या हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यात येत आहे याचा विचार होणे गरजेचे असल्याचे
त्या म्हणाल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More