हत्येचा प्रयत्न प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता – eNavakal
News महाराष्ट्र

हत्येचा प्रयत्न प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता

ठाणे- पूर्ववैमनस्यातून प्राणघातक शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटक तिघा आरोपींवर पोलिसांनी लावलेले आरोप हे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आले. कुठलाही ठोस पुरावा नसल्याने ठाणे जिल्हा अतिरिक्त सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. वाय. जाधव यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी या प्रकरणात सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले. घटनेच्या दिवशी 28 सप्टेंबर,2010 रोजी एनुल्ला बर्कत्तुल्ला उर्फ गुंजन शेख(36), शमशुल्ला हुंडा बर्कत्तुल्ला शेख(31) आणि तौफिक मास्टर खान उर्फ शेख(31) यांनी पूर्ववैमनस्येतून प्राणघातक हत्यारासह ढवळे गावातील तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हत्येचा प्रयत्न प्रकरणी पोलिसांनी एनुल्ला, शमशुल्ला आणि तौफिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका

मुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....
Read More
post-image
News देश

एम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप! महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड

नवी दिल्ली-  लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...
Read More
post-image
News मुंबई

नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण

मुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर

ग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...
Read More
post-image
News मुंबई

पुणे होर्डिंग दुर्घटना! सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...
Read More