हंगेरीत पहिल्यांदा लग्न करणार्‍याला 25 लाखांचे कर्ज मिळणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

हंगेरीत पहिल्यांदा लग्न करणार्‍याला 25 लाखांचे कर्ज मिळणार

बुडापेस्ट – युरोपियन देश हंगेरीचा लोकसंख्येचा दर कमी होत आहे. त्यामुळे या देशाच्या सरकारने लोकसंख्या वाढविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले आहे. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्तोर ऑबर्न यांनी 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पहिल्यांदा लग्न करणार्‍या महिलांना 25 लाख रुपयापर्यंत विना  व्याज कर्ज देण्याची घोषणा केली आहे. तिसरे अपत्य झाल्यानंतर हे कर्ज माफ होईल. हंगेरीचे भविष्य नव्या पिढीवर अवलंबून आहे. त्यामुळे ज्या महिला जास्त मुले जन्माला घालतील त्यांना आयुष्यभर इन्कमटॅक्स भरावा लागणार नाही. त्याशिवाय तीनहून जास्त अपत्ये असणार्‍या जोडप्यांना सरकार सात सीटर गाडी खरेदीसाठी 6 लाख रुपयांची मदत करेल. पंतप्रधान म्हणाले की, हंगेरीची लोकसंख्या 98.8 लाख असून दरवर्षी 32 हजारांनी घटली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More