स्विस बँक खात्याची माहिती सांगण्यास सरकारचा नकार – eNavakal
देश विदेश

स्विस बँक खात्याची माहिती सांगण्यास सरकारचा नकार

नवी दिल्ली –  स्विस बँकेकडून काळया पैशासंबंधी मिळालेली माहिती सांगण्यास सरकार नकार देत आहे. गोपनियतेच्या कारणास्तव ही माहिती देत नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. स्विस बँकेत भारतीयांनी दडवलेल्या काळया पैशांची माहिती मिळावी यासाठी एका वृत्तसंस्थेच्या वार्ताहराने माहिती अधिकार कायद्यांतर्गत केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे ही माहिती मागवली होती. स्वित्झर्लंडकडून भारतीयांच्या काळ्या पैशाबाबत देण्यात आलेली माहिती स्वित्झर्लंडमध्ये काळा पैशा ठेवणार्‍या व्यक्‍ती व कंपनीची नावे तसेच या दोषींवर करण्यात आलेली कारवाई आदी माहिती या अर्जाद्वारे मागवण्यात आली होती. काळया पैशाविरोधात सुरू असलेल्या तपासाला अनुसरून स्वित्झर्लंडकडून प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र माहिती दिली जाते. ही माहिती गोपनीय तरतूदींच्या अखत्यारित येत असल्याने ती उघड करता येणार नाही असा खुलासा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केला आहे.
स्विस बँकेत भारतीयांनी दडवलेल्या काळया पैशाची माहिती मिळावी यासाठी पुरेशी कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली असून तेथे 2018 नंतर ठेवण्यात आलेल्या काळया पैशांची माहिती चालू वर्षांपासून मिळवण्यास सुरूवात होईल व ही प्रक्रिया सुरूच राहील असे या मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

नाशिकच्या मुथूट दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीला सुरतमधून अटक

नाशिक – नाशिक पोलिसांनी मुथूट दरोडा आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपाला सुरतमधून अटक केली असून जितेंद्र बहादूर सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ तीन मंत्र्यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई – ना. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा मिळाला असून त्यांच्या मंत्रिपदाला आव्हान देण्यार्‍या याचिकेवर तातडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More