स्वाईन फ्लूमुळे राज्यात एका महिन्यात १५ जणांचा मृत्यू – eNavakal
आरोग्य महाराष्ट्र

स्वाईन फ्लूमुळे राज्यात एका महिन्यात १५ जणांचा मृत्यू

पुणे – स्वाईन फ्लूने राज्यात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. १८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीत राज्यात तब्बल १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ महिन्यांमध्ये स्वाईन फ्लूने ११२ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये ९० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर राज्याच्या संसर्गजन्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते १८ सप्टेंबर या कालावधीत राज्यात सुमारे २१ लाख १८ हजार २७० स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली.

२०१७ मध्ये ६१४४ रुग्णांना फ्लूची लागण झाली होती आणि यातील सुमारे १३ टक्के रुग्ण दगावले होते. त्या तुलनेत २०१८मध्ये रुग्णांची संख्या जवळपास ५७ टक्क्यांनी कमी झाली असून २५९४ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. मात्र त्या तुलनेत मृत्यूची संख्या वाढली असून ती १३ वरून १८ टक्क्यांवर पोहोचली आहे. स्वाईन फ्लूच्या साथीचा प्रभाव हा एक वर्षाआड अधिक असतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More