स्वाईन फ्लूचा चाकणमध्ये दुसरा बळी – eNavakal
News महाराष्ट्र

स्वाईन फ्लूचा चाकणमध्ये दुसरा बळी

चाकण- चाकण व परिसरात स्वाईन फ्लूने चांगलेच डोके वर काढले असून, मागील आठवड्यात चाकण येथील एका विवाहितेच्या मृत्यू नंतर आता कडाचीवाडी ( ता. खेड ) येथील पस्तीस वर्षीय विवाहितेचा या गंभीर आजाराने बळी गेला आहे. चाकण भागातील स्वाईन फ्लूचा हा दुसरा बळी असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  शर्मिला एकनाथ कड (35) रा. कडाचीवाडी, ता. खेड) असे स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. प्रदीप शंकर कड (26) रा. कडाचीवाडी,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्याच आठवड्यात अनिता सिंग (30) रा.मेदनकरवाडी-चक्रेश्वर रोड, चाकण, ता.खेड, जि. पुणे.) या विवाहितेचा या गंभीर आजाराने मृत्यू
झाला होता.

दरम्यान, शर्मिला कड यांना स्वाईन फ्लू झाल्याचा पॉझीटीव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. कड यांना सर्दी, खोकला, घशात खवखव होणे, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा अखेर मृत्यू झाला. चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
देण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०३-२०१९)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०७-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण : सर्व आरोपींची मुक्तता

नवी दिल्ली – 12 वर्षांपूर्वी झालेल्या समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय पंचकुलामधील विशेष एनआयएच्या न्यायालयाने दिला आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

टीव्हीवर ‘हे’ भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबवली

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान टीव्हीवर एक भाषण लागलं आणि पवारांनी चक्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

शमीला वर्ल्ड कपसाठी पुरेशी विश्रांती मिळणार

मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगमध्ये भारतीय संघातील खेळाडूंवर पडणाऱ्या अतिरिक्त तणावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वर्ल्ड कपचं महत्त्व लक्षात घेता किंग्स इलेव्हन पंजाब...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

आता इंस्टग्रामवरून शॉपिंग करता येणार

नवी दिल्ली – इंस्टग्राम या सध्याच्या लोकप्रिय अॅपने निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. इन्स्टाग्राम अॅपमध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या...
Read More