स्वरा भास्कर करतेय ‘या’ तीन पक्षांचा प्रचार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

स्वरा भास्कर करतेय ‘या’ तीन पक्षांचा प्रचार

नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर या देशभरातील लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना दिसत आहे. भाजपाच्या विरोधात प्रचार करताना स्वरा भास्कर ही आप, कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभांना हजेरी लावत आहे.

स्वराने तिच्या प्रचाराची सुरुवात बिहारमधून केली. बिहारच्या बेगुसराय मतदारसंघातील कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्या प्रचार रॅलीत स्वरा सहभागी झाली होती. बिहारनंतर स्वराने तिचा मोर्चा मध्य प्रदेशकडे वळविला होता. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या प्रचारसभेला स्वरा भास्करने हजेरी लावली. भोपाळमध्ये तिने काँग्रेससाठी प्रचार केला. त्यानंतर स्वरा भास्कर हिने दक्षिण दिल्लीतील आपचे लोकसभा उमेदवार राघव चड्डा यांचादेखील प्रचार केला. तसेच पूर्व दिल्लीतील आपचे उमेदवार आतिशी मार्ले यांच्या प्रचारात हजेरी लावली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More