स्वयंसेवक संघाची भव्य ‘रामराज्य रथयात्रा’ निघणार, अयोध्येपासून रामेश्वरपर्यंत 6 जिल्हे, 39 दिवस, 40 सभांचे आयोजन – eNavakal
News देश राजकीय

स्वयंसेवक संघाची भव्य ‘रामराज्य रथयात्रा’ निघणार, अयोध्येपासून रामेश्वरपर्यंत 6 जिल्हे, 39 दिवस, 40 सभांचे आयोजन

अयोध्या – आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रमुख प्रचाराचे बिगूल 13 फेब्रुवारीला महाशिवरात्री दिवशीच वाजणार आहे. या दिवशी अयोध्या ते रामेश्वर अशी भव्य ‘रामराज्य रथयात्रा’ निघणार आहे. 6 जिल्हे, 39 दिवस आणि 40 सभा असे या रथयात्रेचे प्रचंड नियोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद करणार असून या रथयात्रेमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघणार आहे.                                                                                                    भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांची विशाल रथयात्रा निघाली आणि 6 डिसेंबर 1992 या दिवशी बाबरी मशीद पाडून जे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे केंद्रात भाजपाचे सरकार आले. त्यानंतर पुन्हा एकदा अशाच रथयात्रेचे नियोजन केले आहे. अयोध्येत राम मंदिर बनविणारच ही घोषणा देत ही यात्रा जशी पुढे जाईल, तसे वातावरण भगवामय होऊन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा दणदणीत यश येईल अशी अपेक्षा आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणी, देशात रामराज्याची स्थापना आणि शाळेच्या पुस्तकात रामायणाचा धडा घेणे ही या यात्रेची उद्दिष्टे आहेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या सहा राज्यांतून ही यात्रा जाणार आहे. त्यामुळे या सहाही राज्यांत कडक सुरक्षा ठेवण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. या यात्रेवेळी प्रत्येक राज्यात किमान सहा सभा होणार आहेत. या सभांचे आयोजनही भव्यदिव्य केले जाईल.
रामराज्य रथयात्रेचे अधिकृत आयोजक श्री रामदास युनिव्हर्सल सोसायटी आहे आणि या रथयात्रेचे नेतृत्व स्वामी कृष्णानंद सरस्वती आणि शक्ती शांतानंद महर्षी करणार आहेत. प्रत्यक्षात मात्र या रथयात्रेचे पूर्ण नियोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या हाती आहे. अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यालय हे राम मंदिर उभारणीच्या आंदोलनावेळी 1990 साली स्थापन करण्यात आले होते. याच कार्यालयात राम मंदिरासाठी लागणार्‍या शीला जमवून त्या योग्य आकारात तयार करण्याचे काम सुरू आहे. याच कार्यालयापासून रथयात्रेचा प्रारंभ होणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 13 फेब्रुवारीला महाशिवरात्री दिवशी दुपारी 2 वाजता रथयात्रेचा प्रारंभ करतील. शोभा यात्रेने रामराज्य रथयात्रेची सुरुवात होईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More
post-image
देश

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरी तालुक्यात दोन महिला माओवादींना गोळ्या झाडून ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल पुरोहितांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच

नवी दिल्ली – २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. कर्नल पुरोहित यांनी विशेष न्यायालयाद्वारे बेकायदा...
Read More