(अपडेट)स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच हतबल न्यायाधीश जनतेसमोर;सरन्यायाधीशाना लिहिलेले पत्र माध्यमांना सोपवले  – eNavakal
News देश न्यायालय

(अपडेट)स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच हतबल न्यायाधीश जनतेसमोर;सरन्यायाधीशाना लिहिलेले पत्र माध्यमांना सोपवले 

नवी दिल्ली – स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतल्याची घटना घडली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. चेलमेश्वर यांच्यासह  रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली.न्यायालयाच्या प्रशासनाचे कामकाज गेले काही महिने व्यवस्थित होत नाहीय. सरन्यायाधीशांची भेट घेऊन याविषयी त्यांना माहिती दिली मात्र त्याचा काही फायदा झाला नाही त्यामुळे आता आम्ही जनतेसमोर आलो आहोत असे उद्गार न्या. चेलमेश्वर यांनी काढले. काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवरून सरकार आणि न्याय संस्थेमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशी याचा संबंध जोडला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासन नीट काम करत नाही. ही बाब आम्ही सरन्यायाधिशांपर्यंत पोहोचवली होती. याबाबत आम्ही त्यांना पत्र देखील लिहले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अगदी आज सकाळी एका विषयाबाबत जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. पण पुन्हा तेव्हा तोच अनुभव आला. त्यामुळे या गोष्टी देशासमोर आणण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असे न्या. चेलमेश्वर यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेणे ही कोणत्याही देशात एक ऐतिहासिक घटना ठरते. विशेषत: भारतासारख्या देशात अधिक ठरते. भारतीय न्यायव्यवस्थेमधील ही घटना महत्त्वाची आहे. गेल्या दोन महिन्यातील सर्वोच्च न्यायालयातील कारभारामुळे व्यथित होऊन आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत.

 


या सर्वबाबी आम्ही सरन्यायाधिशांना पत्राद्वारे कळवल्या आहेत. ते पत्र आज आम्ही सार्वजनिक करत आहोत असे, न्या.रंजन गोगोई यांनी सांगितले. 20 वर्षानंतर नागरिकांनी असे म्हणू नये की सर्वोच्च न्यायालयातील चार जेष्ठ न्यायमूर्तींनी त्यांचा आत्मा विकला होता, असे न्या. चेलमेश्वर म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय मनोरंजन

सुशांत आत्महत्येप्रकरणी रियाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात पाटण्यात एफआयआर दाखल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गणेशोत्सवावर पावसाचे संकट! राज्यात ४-५ दिवसांत मुसळधार कोसळणार

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. या पावसामुळे कोल्हापूरसह...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत ९३१, पुण्यात २,५४३ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख १५ हजार ४७७ वर

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६ लाख १५ हजार ४७७ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात राज्यात ११ हजार ११९ नवे कोरोना रुग्ण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नागपुरात उच्चशिक्षित डॉक्टरची कुटुंबियांसह आत्महत्या

नागपूर – नागपुरात आज सकाळी सर्वांना धक्का देणारी भीषण दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरमधील डॉक्टर धीरज राणे त्यांची पत्नी सुषमा राणे, त्यांचा अकरा वर्षाचा...
Read More
post-image
न्यायालय महाराष्ट्र

मराठा आरक्षण हे केंद्राच्या आर्थिक आरक्षणासोबत पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ऐकले जावे

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 25 ऑगस्टला आणि नंतर सप्टेंबर महिन्यात रितसर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते ॲड. विनोद पाटील...
Read More