स्वच्छ मिठी नदीसाठी नदीतील पाण्यावर प्रक्रिया करुन पाणी करणार स्वच्छ – eNavakal
News मुंबई

स्वच्छ मिठी नदीसाठी नदीतील पाण्यावर प्रक्रिया करुन पाणी करणार स्वच्छ

दररोज ८० लाख लीटर पाण्यावर प्रक्रिया करुन नदीत सोडणार, जल प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात                          मुंबई  –  पालिका क्षेत्रात असणा-या मिठी नदीतील पाणी अधिक स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासनाने सर्वस्तरीय प्रयत्न सुरु केले आहेत. हे प्रयत्न प्रामुख्याने चार टप्प्यामंध्ये विभागण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात मिठी नदीच्या उगमापासून १ हजार ६५० मीटर अंतरावर जल प्रक्रिया केंद्र उभारण्याची निविदा प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली आहे. हे केंद्र उभारण्यासाठी सुमारे १२० कोटी रुपये एवढा खर्च अंदाजित आहे. या केंद्राद्वारे दररोज सुमारे ८० लाख लीटर पाण्यावर प्रक्रिया करुन ते मिठी नदीच्या प्रवाहात सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर मिठी नदीच्या पात्राच्या जवळपासच्या परिसरातील सांडपाणी व मलजल वाहून नेण्यासाठी अधिक सक्षम व्यवस्था तयार करण्याची प्रक्रिया देखील महापालिकेच्या संबंधित खात्यांद्वारे करण्यात येणार आहे, जेणेकरुन मिठी नदी अधिकाधिक स्वच्छ राहण्यास मदत होईल. यानुसार मिठी नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठीच्या पहिल्या टप्प्यास पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नुकतीच प्रशासकीय मंजूरी दिली असून उर्वरित तीन टप्प्यांना देखील तत्वत: प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती मुंबई मलनिःसारण प्रकल्पाचे प्रमुख अभियंता  महेश ठाकूर यांनी दिली आहे.
पालिका क्षेत्रातील महत्त्वाची नदी असणा-या मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर एवढी आहे. यापैकी ११.८४ किमी लांबीची नदी ही पालिकेच्या अखत्यारितील भागात असून उर्वरित ६ किमी लांबीची नदी ही ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ यांच्या अखत्यारित येते. या नदीचे पाणलोट क्षेत्र हे साधारणपणे ७ हजार २९५ हेक्टर एवढे आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणा-या विहार आणि पवई तलावांमधून होणारा विसर्ग हा या नदीचा प्रमुख जलस्रोत आहे. मिठी नदीच्या जवळपासच्या परिसरातून नदीमध्ये सांडपाणी, मलजल, कचरा इत्यादी बाबी येत असल्याने मिठी नदीतील पाणी अस्वच्छ होते. त्यामुळे मिठी नदी स्वच्छ करण्याचा प्रकल्प हाती घेताना तो दोन प्रकारात व चार टप्प्यांमध्ये हाती घेण्यात येणार आहे. यानुसार दोन प्रकारांपैकी एका प्रकरांतर्गत नदीतील पाण्यावर प्रक्रिया करुन ते स्वच्छ पाणी पुन्हा नदीच्या प्रवाहात सोडले जाणार आहे. तर दुस-या प्रकारांतर्गत नदीच्या जवळपासच्या परिसरातील भागात मलजल व सांडपाणी वाहून नेणा-या वाहिन्यांचे बांधकाम महापालिकेच्या संबंधित खात्यांद्वारे केले जाणार आहे. जेणेकरुन परिसरातील मलजल वा सांडपाणी नदीच्या पात्रात येण्यास प्रतिबंध होऊ शकेल.मिठी नदीचे पाणी स्वच्छ करण्याच्या पहिल्या टप्प्यात नदीच्या उगमापासून म्हणजेच ‘फिल्टरपाडा’ परिसर ते ‘डब्ल्यूएसपी कम्पाऊंड’ पर्यंतच्या १ हजार ६५० मीटर लांबीच्या नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी जल प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी आवश्यक असणारे प्रक्रिया केंद्र हे ‘डब्ल्यूएसपी कम्पाऊंड’ जवळ उभारण्यात येणार आहे. यासाठी रुपये १२० कोटींचा खर्च अंदाजीत आहे. मे २०१८ पासून हे केंद्र उभारण्याचे काम सुरु होणे अपेक्षित असून केंद्र कार्यान्वित होण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी लागेल. या प्रक्रिया केंद्राद्वारे मिठी नदीतील ८० लाख लीटर पाण्यावर दररोज प्रक्रिया करुन स्वच्छ झालेले पाणी पुन्हा नदीत सोडण्यात येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली असून निविदा प्रक्रियेत भाग घेण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०१८ अशी आहे, अशीही माहिती ठाकूर यांनी दिली आहे. त्याचबरोबर वर नमूद केल्यानुसार पहिल्या टप्प्यातील १ हजार ६५० मीटर लांबीच्या मिठी नदीमध्ये मलजल किंवा सांडपाणी जाण्यास प्रतिबंध व्हावा, यादृष्टीने फिल्टरपाडा ते ‘डब्ल्यूएसपी कम्पाऊंड’ या परिसरात मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे अधिक सक्षम करण्याचे देखील प्रस्तावित करण्यात आले आहे मिठी नदी स्वच्छ करण्याचा उर्वरित तीन टप्प्यांबाबत देखील प्रशासकीय कार्यवाही सुरु करण्यास तत्वतः मंजूरी प्राप्त झाली आहे. यानुसार पहिल्या टप्प्यातील १ हजार ६५० मीटरचे काम पूर्ण झाल्यानंतर दुस-या टप्प्यात त्यापुढील ६ किलोमीटर लांबीच्या नदीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या अंतर्गत मलजल व सांडपाणी वाहून नेणा-या वाहिन्यांचे जाळे उभारण्यासोबतच २ उदंचन केंद्रे देखील उभारण्यात येणार आहे. यासाठी रुपये १६० कोटींचा खर्च अंदाजित आहे. तर तीस-या व चौथ्या टप्प्यात नदीच्या उर्वरित भागातील जवळपास परिसरातील मलजल वाहिन्या अधिक सक्षम करणे, मलजल वाहून नेण्यासाठी ५.२ किमी लांबीचा बोगदा बांधणे इत्यादी कार्ये अपेक्षित आहेत. तथापि, याबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार गठित करण्यात आलेल्या संबंधित समितीची व ‘मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण’ यांची यथायोग्य मंजूरी मिळाल्यानंतर दुस-या, तिस-या व चौथ्या टप्यातील कामे हाती घेता येणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More