स्मिता पाटीलची भाची सिनेमात – eNavakal
मनोरंजन मुंबई

स्मिता पाटीलची भाची सिनेमात

मुंबई – मंत्रमुग्ध करणारा अभिनय म्हटलं की स्मिता पाटीलच… हे एक समीकरणच झालंय. याच स्मिताची भाची खान्देश कन्या म्हणून प्रसिद्ध असलेली झिल पाटील लवकरच मराठी सिनेमात पाऊल ठेवतेय. अखिल देसाई दिग्दर्शित ‘शिष्यवृत्ती’ या मराठी सिनेमातून झिल रुपेरी पडद्यावर झळकणार असून ‘थ्री इडियट’ सिनेमात सेंटीमीटरची भूमिका करणारा दुष्यंत वाघ यात तिचा नायक म्हणून प्रेक्षकांसमोर येईल.

झिल ही स्मिता पाटील यांची दूरच्या नात्याने भाची असून ती नंदुरबार जिल्यातील शहादा येथील राहणारी आहे. यात ती सीमा नावाच्या महिला शिक्षिकेची भूमिका साकारतेय. या सिनेमात कमलेश सावंत, उदय सबनीस, अनिकेत केळकर, अंशुमन विचारे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाचे चित्रीकरण सध्या शहापूरमध्ये सुरू आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कुकडी नदीवरील बंधारा पाण्याअभावी कोरडाच

कवठे येमाई – शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथील कुकडी नदीवरील बंधारा अखेर पाण्याअभावी कोरडाच राहिला असून पाणी न आल्यास या प्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा कडक...
Read More
post-image
News देश निवडणूक

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पाटणा – लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More