स्पेनमध्ये टॅक्सी चालकांचा संप – eNavakal
आंदोलन विदेश

स्पेनमध्ये टॅक्सी चालकांचा संप

माद्रिद – स्पेनमध्ये पुन्हा एकदा टॅक्सी चालक रस्त्यावर उतरले आहेत. आज माद्रिदच्या दिवसाची सुरूवात आंदोलने आणि सरकार विरोधातील घोषणाबाजीने झाली. गेल्या आठवड्यात झालेल्या अयशस्वी चर्चेनंतर पुन्हा एकदा टॅक्सी चालकांना राग अनावर होऊन ते रस्त्यावर उतरले. हा संप टॅक्सी विरुद्ध उबेर, कॅबिफसारख्या व्हीटीसी म्हणजेच भाडयाने वापरणार्‍या वाहनांच्या परवान्यासाठी आहे.

टॅक्सीला आणि इतर वाहनांना वेगवेगळे नियम तयार करण्यात आले आहेत. परंतु आता या संपाला राजकीय रंग निर्माण झाला आहे. टॅक्सी चालकांनी लोकप्रिय पीपी पक्ष म्हणजे पॉप्युलर पार्टीच्या मुख्यालयाबाहेर स्पॅनिश ध्वज लावले. काही दिवसांपूर्वी गॅरीडोंनी सकाळी 15 मिनिटांपूर्वी प्रवास करणार्‍या सेवांचा सखोल अभ्यास करण्याची सक्ती केली होती. गॅरीडो हे कॅटलोन सरकारचे अनुकरण करण्यास तयार आहेत. या संपामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणत हाल झाले. खाजगी वाहने आणि सार्वजनिक वाहनांचा आधार घेऊन नागरिकांना कार्यालय गाठावे लागले. स्पेनमध्ये टॅक्सी चालकांचा संप नेमके कोणते वळण घेते याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More